Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती व मार्गदर्शन सूचना

SHARE:

इयत्ता १ली ते इयत्ता १२वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्

इयत्ता १ली ते इयत्ता १२वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्शन सूचना

दिव्यांग व्यक्तींचा अधिकार अधिनियम, २०१६ (Right of Person With Disability Act (RPWD) संदर्भात केंद्र शासनाने दि.२८ डिसेंबर, २०१६ रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. या अधिनियमातील प्रकरण ३, शिक्षण, कलम १६ व १७ व प्रकरण ६ कलम ३१ व ३२ मध्येही RTE Act, २००९ चा संदर्भ नमूद करुन विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या बालकांमध्ये कोणताही भेदभाव न करता समावेशित शिक्षणाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत नमूद केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ व भारतीय संविधान कलम ४५ नुसार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. वय वर्षे ६ ते १४ वर्षांच्या प्रत्येक बालकास व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्ष वयोगटापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण विषयक सुविधा देणे आवश्यक आहे. शिक्षण विभाग अध्ययनार्थी दृष्टीकोनातून सर्वच बालकांकडे बघत असून त्यांच्याकडून अपेक्षित बदल व अध्ययन निष्पत्ती येणे आवश्यक असते यासाठी काम करत असते. त्यानुषंगाने समावेशित शिक्षणाची संकल्पना, तत्त्वानुसार व काळानुरूप होणाऱ्या बदलानुसार समावेशित शिक्षणाकडून सामान्यीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी ही संकल्पना भविष्यात विकासात्मक परिवर्तनानुसार निरंतर सुरु राहणे ही काळाची गरज आहे.

त्यानुषंगाने विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन पध्दती व मूल्यमापनाची तंत्रे ही देखील विविध अध्ययन शैलीनुसार श्रवण, दृष्य, स्पर्श, बहु अध्ययन शैली (Audio Learner, Visual Learner, Kinaesthetic Learner, Multi Learner) इ. अध्ययन शैलीनुसार असणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्ययन शैलीनुसार Facilitator म्हणून वर्ग शिक्षकांनी अध्यापन करण्याची गरज आहे. विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) म्हणजे अंशत: अंध/पूर्णत: अंध, कर्णबधीर, भाषा व वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग निवारित, शारिरीक वाढ खुंटणे, बौध्दिक अक्षम (मतिमंद), स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचा तीव्र आजार, मल्टीपल स्क्लेरॉसिस ( Multiple Sclerosis), थॅलस्सेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल आजार, अॅसिड अॅटॅक व्हिक्टिम, पार्किनसन्स आजार इ. २१ प्रवर्गातील व इतर आव्हानात्मक परिस्थितीत आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत शिक्षण देताना सुयोग्य अध्ययन शैलीचा उपयोग करतांना गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून वेगळ्या अध्ययन शैलीच्या गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये मूल्यमापन न करता त्यांच्या अध्ययन शैलीनुसार ज्ञानाच्या, भाषेच्या मूल्यमापनाच्या पध्दती विकसित असणे अपेक्षित आहे.

संदर्भित शासन निर्णयाव्दारे विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विविध बहु अध्ययनशैलीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण विद्यार्थ्यांना असलेल्या परिक्षा योजनेप्रमाणे मूल्यांकन न करता परीक्षा पध्दतीमध्ये अनुकूलन (Adaptive Approach) करुन देणे आवश्यक आहे. परिणामी Facilitator / शिक्षक यांनी अध्यापन केलेल्या व उपयोगात आणलेल्या मूल्यांकन पध्दतीमध्ये विद्यांर्थ्यामध्ये प्रगती चांगली दिसून येईल व शिक्षकांमध्ये आनंद, विश्वास व स्वयंप्रेरणा दिसून येईल. या विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यास क्षेत्रांची ओळख होणे, बुध्दी कौशल्य, उद्यमशीलता या सर्व बाबींचा म्हणजेच सर्वंकष अभ्यास होणे आवश्यक आहे .

याकरिता या विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या (दिव्यांग) बहु अध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत सर्व मुलांबरोबर एकत्रित शिक्षण घेता यावे, याकरिता प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी करिता सर्व शिक्षा अभियान (दिव्यांग) समावेशित शिक्षण (IED Inclusive Education for Disabled) व इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान - (दिव्यांग) समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर (IEDSS-Education for Disabled at Secondary State) सुरु करण्यात आलेले होते. या सर्वाचा विचार आता एकत्रितपणे समग्र शिक्षा अभियानातंर्गत पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत समतात्मक दृष्टीकोनातून गुणात्मक समानता साध्य करण्यासाठी होत आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा पध्दती अध्ययन शैलीनुसार (Learning Style) असणे आवश्यक आहे. यासाठी विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा पध्दतीमध्ये समतात्मक दृष्टीकोनातून अध्ययन शैलीनुसार अनुकूलन Adaptation करुन समाजातील उत्पादनशील घटक म्हणून समान पातळीवर आणणे हा देखील यामागील मुख्य उद्देश आहे.

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनामध्ये गरजेनुसार अध्ययनार्थी दृष्टीकोनातून अध्ययनशैलीनुसार अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा उपयोग करण्यासंदर्भात शासन स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता १ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्ययन शैलीनुसार सुलभ अध्ययन व अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा व शैक्षणिक सवलतींचा उपयोग करण्यात यावा.

अंशत: अंध/पूर्णत: अंध विद्यार्थ्यांकरिता

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी. शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी आवाजाच्या गणकयंत्राचा कॅलक्युलेटर (Talking Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील (Arial २० Size) प्रश्नपत्रिका छापण्यात यावी. विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर १ व २) या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • परीक्षा कालावधीमध्ये गणितीय पाटीचा (Trailer Frame) वापर करता येईल.
  • अंशत: अंध विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी स्केच पेनचा व प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी ग्लास मॅग्निफायरचा वापर करता येईल.
  • परीक्षेच्या वेळी गरजेनुसार अॅबॅकस व भूमितीय साहित्य साधनांचा वापर करता येईल. आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील. याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याला संगणकाद्वारे परीक्षा द्यावयाची असल्यास स्क्रीन रिडींग सॉफटवेअर असलेल्या संगणक NVDA Software / Super Nova तसेच वेळोवेळी अद्यावत ICT तंत्राचा वापर करता येईल. परंतु, त्यासाठी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. (शाळेने याबाबतचा पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे.)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

कुष्ठरोगातून बरे झालेले निवारित (Leprosy Cured Persons) विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा). या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शिकत असलेल्या शाळा / महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्याच्या व्यवस्थेसाठी अनुकूल तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन / संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात यावी.

कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादेत लिहिता येईल. दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे मुद्यांमध्ये लिहिता येतील. दिर्घोत्तरी प्रश्नांमध्ये मुख्य मुद्यांच्या अनुषंगाने (Key Points) उत्तरे लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती / उत्तरे दिली आहेत का, ते तपासून गुणदान करावे.
  • या मुलांसाठी स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नये. मौखिक मूल्यमापनासाठी लेखीचा पर्याय देण्यात यावा.
  • परीक्षेसाठी सर्व मौखिक मार्गदर्शक सूचना फलकावर लिहून देण्यात याव्यात.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन / संगणक खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.
  • त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्यासाठी सवलत देय राहील.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर करु देण्यात यावा. उदा. पेन्सिल व ग्रीप्स. (५) शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism):
  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन / संगणक खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.

बौध्दिक अक्षम (मतिमंद) (Intellectual Disability-Mentally challenged)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र ( Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशिन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कारक कौशल्ये अविकसित असतात, याचा विचार करून त्यांना अनुकूलित (Adaptive) सुलभ वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर वापरण्याची परवानगी द्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील, याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील.
  • प्रश्नपत्रिकेतील भाषा सरळ व सोपी असावी (इयत्ता १ली ते ९ वी साठी).
  • मूल्यमापन प्रक्रियेसाठी योग्य अध्ययन अध्यापन साहित्य वापरण्याची लवचिकता देण्यात यावी.
  • पूर्ण विराम, स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नये.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्या यांनी या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता / पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील. याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील.
  • विज्ञान व तंत्रज्ञान पेपर १ व २ या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा देता येईल. तोंडी परीक्षेत प्रयोगांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • मुलांच्या अध्ययन शैलीनुसार व गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असणारे फेरबदल करून प्रश्नपत्रिका तयार करण्यात याव्यात (फक्त इयत्ता १ली ते ९वी साठी)
  • बहुविकलांग मुलांना अतिरिक्त सूचना किंवा संकेताची गरज भासते, तेव्हा परीक्षेच्या वेळ बैठकीची वेगळी व्यवस्था असावी. आवश्यकतेनुसार दुभाषक / वाचक देण्यात यावा
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर करू देण्यात यावा. उदा. पेन्सिल व ग्रीप्स.

मानसिक आजार (Mental Illness)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच बसण्यासाठी अनुकुलित वातावरणात टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.
  • या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्र वर्गात घेण्यात यावी. (वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार गरज असल्यास)
  • विद्यार्थी अचानक आक्रमक / हिंसक बनला तर परिस्थिती हाताळू शकेल, असाच पर्यवेक्षक नेमावा.

ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा). या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याला खात्री वाटेल, अशा व्यक्तीस परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे / तक्ते इ. काढण्याची सवलत देण्यात येईल. त्याचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात देण्यात येतील.
  • प्रात्यक्षिक आणि प्रकल्प परीक्षेस विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • मौखिक मूल्यमापनासाठी लेखीचा पर्याय देण्यात यावा.
  • आवश्यकतेनुसार वाचनिक/ Prompter (सूचक) देण्यात यावा.
  • प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादेत लिहिता येईल. दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे मुद्यांमध्ये (Key Points) लिहिता येतील. दिर्घोत्तरी प्रश्नांमध्ये मुख्य मुद्याच्या अनुषंगाने उत्तर दिल्यास परीक्षकांनी परीक्षेतील उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती / उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे.
  • या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्र वर्गात घेण्यात यावी.
  • अचानक उपचार करावे लागतील, अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास, अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पुन:परीक्षेची (Re-Exam) परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा.
  • या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कारक कौशल्य अविकसित असतात, त्याचा विचार करुन त्यांना वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर वापरण्याची परवानगी देण्यात यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका टाईप करुन वा लिहून देण्याची परवानगी देण्यात यावी.
  • या मुलांसाठी स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नये.
  • परीक्षेसाठी सर्व मौखिक मार्गदर्शक सूचना फलकावर लिहून देण्यात याव्यात. ९.२१ मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

सेरेबल पाल्सी विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनकुल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्यासाठी सवलत देय राहील.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल.
  • या मुलांना अतिरिक्त सूचना किंवा संकेताची गरज भासते, तेव्हा परीक्षेची वेळी त्यांची बैठकीची वेगळी व्यवस्था करण्यात यावी.
  • अनुकूलशील साहित्य आणि उपकरणांचा वापर करु देण्यात यावा. उदा. पेन्सिल व ग्रीप्स. हे विद्यार्थी जास्त दाब देऊन लिहितात, त्यासाठी आवश्कतेनुसार कागद / उत्तरपत्रिका जाड पानांची देण्यात यावी.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

स्नायूंची विकृती (Muscular Dystrophy) विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.
  • त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्यासाठी सवलत देय राहील.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

मज्जासंस्थेचे तीव्र आजार (Chronic Neurological Conditions)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्यासाठी सवलत देय राहील.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.

अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील, याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कारक कौशल्ये अविकसित असतात, याचा विचार करुन त्यांना अनुकूलित (Adaptive) प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर वापरण्याची परवानगी देण्यात यावी.
  • प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादेत लिहिता येईल. दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे
  • मुद्यांमध्ये (Key Points) लिहिता येतील. अशा दिर्घोत्तरी प्रश्नांमध्ये मुख्य मुद्याच्या अनुषंगाने उत्तर लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती / उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

गतीमंद (Slow Learner / Intellectual Disability Border line)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील, याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कारक कौशल्ये अविकसित असतात, याचा विचार करुन त्यांना वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर, गणकयंत्र वापरण्याची परवानगी देण्यात यावी.
  • प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादेत लिहिता येईल. दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे मुद्यांमध्ये (Key Points) लिहिता येतील. अशा दिर्घोत्तरी प्रश्नांमध्ये मुख्य मुद्याच्या अनुषंगाने उत्तर लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती / उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

मल्टीपल स्क्लेरॉसिस (Multiple Sclerosis) विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा.
  • शालेय स्तरावर इयत्ता १ ली ते ९ वी ही सुविधा गरजेनुसार व इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित सर्व शाखा, पुस्तक पालन लेखाकर्म, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांसाठी गणकयंत्र (Calculator) वापरण्याची इच्छा असेल तर कॅलक्युलेटर वापरता येईल. (शालेय स्तरावर या साहित्याची गरज भासते)
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार गरज असल्यास या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळया वर्गात करावी, वेळ प्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी. परीक्षा विभाग प्रमुख, महाविद्यालयीन अधिकारी यांच्या परवानगीने आवश्यकता असेल तर परीक्षा हॉस्पिटल अथवा विद्यार्थ्यांच्या घरी घेण्यात यावी.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)

वाचा व भाषा अक्षमत्व (Speech and Language Disability) विद्यार्थ्यांसाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्याची सवलत देण्यात यावी.
  • प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादेत लिहिता येईल. दिर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे
  • मुद्यांमध्ये लिहिता येतील. दिर्घोत्तरी प्रश्नांमध्ये मुख्य मुद्यांच्या अनुषंगाने (Key Points) उत्तरे लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती / उत्तरे दिली आहेत का, ते तपासून गुणदान करावे.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असलेले फेरबदल प्रश्नपत्रिकेत करण्यात यावे. (इयत्ता १ ली ते इयत्ता ९ साठी)
  • या मुलांसाठी स्पेलिंग, व्याकरण, विराम चिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नये.
  • मौखिक मूल्यमापनासाठी लेखीचा पर्याय देण्यात यावा.
  • परीक्षेसाठी सर्व मौखिक मार्गदर्शक सूचना फलकावर लिहून देण्यात याव्यात.
  • तोंडी परीक्षा लेखी स्वरुपात देण्याची परवानगी देण्यात यावी.

थॅलस्सेमिया (Thalassemia)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • इन्फेक्शनची शक्यता लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार गरज विचारात घेऊन बैठक व्यवस्था वेगळया वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी व परीक्षा विद्यार्थ्यांच्या घरी घेण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांना लिहावयाचे सोयीचे व्हावे, यासाठी वेगळया प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्याला खात्री वाटेल, अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी.
  • यापेक्षा वेगळया सोयी हव्या असतील तर पालक, विषय शिक्षक, प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख यांच्या समन्वयाचे ठरविण्यात यावे.

हिमोफिलिया (Hemophilia)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा ).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • इन्फेकशनची शक्यता लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांपैकी वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार गरज विचारात घेऊन बैठक व्यवस्था वेगळया वर्गात करावी. वेळ प्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकांची नेमणूक करावी व परीक्षा विद्यार्थ्यांच्या घरी घेण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांना लिहावयाचे सोयीचे व्हावे, यासाठी वेगळया प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी त्याला खात्री वाटेल, अशी व्यक्ती परीक्षा विभाग प्रमुख यांच्या समन्वयाने ठरविण्यात यावे.
  • यापेक्षा वेगळ्या सोयी हव्या असतील तर पालक, विषय शिक्षक, प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख यांच्या समन्वयाचे ठरविण्यात यावे.

सिकल सेल (Sickle Cell Disease)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • इन्फेकशनची शक्यता लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार गरज विचारात घेऊन बैठक व्यवस्था वेगळया वर्गात करावी, वेळ प्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकांची नेमणूक करावी व परीक्षा विदयार्थ्यांच्या घरी घेण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांना लिहावयाचे सोयीचे व्हावे, यासाठी वेगळया प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी त्याला खात्री वाटेल, अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी.
  • यापेक्षा वेगळया सोयी हव्या असतील तर पालक, विषय शिक्षक, प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख यांच्या समन्वयाचे ठरविण्यात यावे.

अॅसिड अॅटॅक व्हिक्टिम (Acid Attack Victim) विद्यार्थ्यासाठी

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/ पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • विद्यार्थ्यांना लिहावयाचे सोयीचे व्हावे, यासाठी वेगळया प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रीपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी.
  • विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळया वर्गात करावी, वेळ प्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी.

पार्किंनसन्स (Parkinoson Disease)

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इ. काढण्याची सवलत देण्यात यावी.
  • तोंडी परीक्षा लेखी स्वरुपात देण्याची परवानगी देण्यात यावी.

इतर आजारांमुळे शालेय शिक्षणात अडचणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत

I) एपिडरमोलिसिस बुलोसा (Epidermolysis Bullosa)

II) HIV बाधित

IV) Pediatric cancer survivors,

III) Diabetes mellitus type,

V) Cancer afflicted children on maintenance therapy,

VI) Children with epilepsy

VII) Children with ADHD

VIII) Children with neurological Wilson disease

या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांसाठी घ्यावयाची काळजी.

  • विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील (विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शाळा किंवा घराजवळची शाळा).
  • या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ देय राहील.
  • अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात यावी.
  • वैद्यकिय प्रमाणपत्रानुसार लेखनिकाची गरज असल्यास लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी.
  • शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण मंडळाची मान्यता/पूर्वपरवानगी घ्यावी.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विनियम, १९७७ मधील विनयिम क्र. ९९ व विनियम क्र. ५२ नुसार सवलतीचे गुण फक्त नियमित व सर्व ६ विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच देय राहील.
  • ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका टाईप करणे किंवा लिहिण्यासाठी, तसेच पूर्ण पेपर किंवा पेपरचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिक घेण्यास परवानगी देण्यात येईल.
  • आकृत्या, नकाशे इ. काढण्यासाठी सवलत देय राहील, याचे गुण त्या विद्यार्थ्याला प्रमाणात देण्यात येतील.
  • विज्ञान व तंत्रज्ञान पेपर १ व २ या विषयांच्या प्रात्याक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा देता येईल, तोंडी परीक्षेत प्रयोगांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असणारे फेरबदल करून प्रश्नपत्रिका तयार करण्यात याव्यात. (फक्त इयत्ता १ली ते ९वी साठी).
  • बहुविकलांग मुलांना अतिरिक्त सूचना किंवा संकेताची गरज भासते, तेव्हा परीक्षेच्या वेळी बैठकीची वेगळी व्यवस्था असावी.
  • प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा / बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा (प्रात्यक्षिकांवर आधारित) देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले जावेत.
  • या मुलांना अतिरिक्त सूचना किंवा संकेताची गरज भासते, तेव्हा परीक्षेच्या वेळी त्यांची बैठकीची वेगळी व्यवस्था करण्यात यावी.
  • अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी तांत्रिक पध्दतीचा वापर करण्यात यावा. उदा. संगणक व संगणक प्रणाली (Voice Synthesizer).
  • प्रश्नांची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी संप्रेषण बोर्डचा (Communication Board) वापर करावा.
  • अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर करू देण्यात यावा. उदा. पेन्सिल व ग्रीप्स.
  • हे विद्यार्थी जास्त दाब देऊन लिहितात, त्यासाठी आवश्यकतेनुसार कागद / उत्तरपत्रिका जाड पानांची देण्यात यावी.

टिप:-विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी ज्या शाळांमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत त्या शाळांसोबत त्यांचे सुयोग्य समायोजन झालेले असते. मात्र परिक्षा केंद्र हे दुसऱ्या शाळांमध्ये दिले गेल्यास नविन ठिकाणच्या परिक्षा केंद्रावर परिक्षे दरम्यान समायोजन होण्यास अडथळे येतात. तरी परिक्षा मंडळाने शक्यतो दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातच परिक्षा केंद्र देण्यात यावे.

लेखनिक

  • इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंत आवश्यकतेनुसार लेखनिक घेण्यास मुभा द्यावी लेखनिक हा मागील इयत्तेचा असावा.
  • इयत्ता १०वी ते १२वी पर्यंत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना गरजेनुसार प्रौढ लेखनिक घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

लेखनिक घेण्याबाबतचे निकष

  • लेखनिक निवडताना प्राधान्याने परीक्षा द्यावयाच्या वर्गाच्या एक इयत्ता खालच्या वर्गाचा विद्यार्थी निवडण्यात यावा.
  • उपरोक्त १ येथे नमूद प्रमाणे लेखनिक उपलब्ध होत नसल्यास प्रौढ (Adult) लेखनिक घेता येईल. प्रौढ (Adult) लेखनिक हे शाळेतील अथवा अन्य शाळेतील शिक्षक, खाजगी शिकवणी वर्गातील
  • शिक्षक/प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे जवळचे नातेवाईक नसावेत. तथापि, विशेष बाब म्हणून जवळच्या नातेवाईकांना लेखनिक म्हणून परवानगी देण्याचे अधिकार ( प्रकरणांची शहानिशा करुन) संबंधित अध्यक्ष विभागीय मंडळ यांना राहील.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना "मागील इयत्तेचा विद्यार्थी अथवा प्रौढ" लेखनिक म्हणून नेमून देण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना राहतील. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडचणी व गरज याबद्दलची जाणीव संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना असल्याने हे अधिकार त्यांना राहतील. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडचणी व गरज याबद्दलची जाणीव संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना असल्याने हे अधिकार त्यांना राहतील.

दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याकरिता शिफारस देण्याची जबाबदारी व त्याची पध्दत

  • शाळेतील मुख्याध्यापक / कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य सदर विद्यार्थ्यांसाठी लेखनिक देण्याबाबत स्पष्ट अभिप्राय / शिफारशीसह संबंधित विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑगस्टपर्यंत शिफारस करतील. विभागीय मंडळ प्रस्तावांच्या मान्यतेबाबत अहवाल १५ दिवसांच्या आत तात्काळ संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना लेखी कळवतील.
  • ज्या विद्यार्थ्यास लेखनिक दिले जातील त्या लेखनिकाचा तपशील शाळेचे मुख्याध्यापक/कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संबंधित (प्रौढ लेखनिकाचे शासनमान्य ओळखपत्राची प्रत व पालकांचा अर्ज या तपशीलासह) विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करतील.
  • अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऐनवेळी लेखनिक देण्याबाबतचा निर्णय संबंधित सेंटर प्रमुखास घ्यावा लागल्यास, त्यांना त्याबाबतचा अधिकार राहील व त्यांनी संपूर्ण वस्तुस्थितीसह विभागीय परीक्षा मंडळाची याकरिता कार्योत्तर मान्यता घ्यावी.

शासन निर्णय संदर्भ – १६ ऑक्टोबर २०१८

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,6,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,जयंती फलक,5,तंत्रज्ञान,139,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,105,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,113,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,22,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,56,विद्यार्थी कट्टा,377,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,644,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,548,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,801,All Update,319,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,517,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती व मार्गदर्शन सूचना
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती व मार्गदर्शन सूचना
इयत्ता १ली ते इयत्ता १२वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQBK9OV_T4DNoESMr1MR932PBHyDbmL520V7ty1g6wf8gdgINzybBLxi_2HPDZdajO1hykVRjDjVfVHFbny6PuNSoaslVQXl5r-XTp0BON_AjNw46cceWiDH9nFTwspk3lzge1uq9XnfkPjLamuVI2N6JTjDRBcf4k1R7seHx8smYz-OLXQspoYto6b3U/s16000/disabilities%20according%20to%20their%20learning%20style.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQBK9OV_T4DNoESMr1MR932PBHyDbmL520V7ty1g6wf8gdgINzybBLxi_2HPDZdajO1hykVRjDjVfVHFbny6PuNSoaslVQXl5r-XTp0BON_AjNw46cceWiDH9nFTwspk3lzge1uq9XnfkPjLamuVI2N6JTjDRBcf4k1R7seHx8smYz-OLXQspoYto6b3U/s72-c/disabilities%20according%20to%20their%20learning%20style.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2024/05/divyang-vidyarthyanche-mulyamapan-gr.html
https://www.aapalathakare.com/

true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS