मतदान ओळखपत्र,मतदान ओळखपत्र कसे काढावे,मतदान ओळखपत्र काढणे,मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी
मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र
ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून
त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार
आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप
निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही
जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
मतदान ओळखपत्र,मतदान ओळखपत्र कसे काढावे,मतदान ओळखपत्र काढणे,मतदान ओळखपत्र कागदपत्रे,मतदान ओळखपत्र download,मतदान ओळखपत्र क्रमांक,मतदान ओळखपत्र online,मतदान ओळखपत्र आधार कार्ड,मतदान ओळखपत्र फोटो,मतदार ओळखपत्र,मतदान ओळखपत्र कसे काढावे,मतदान ओळखपत्र काढणे,मतदान ओळखपत्र कागदपत्रे,मतदान ओळखपत्र download,मतदान ओळखपत्र क्रमांक,मतदान ओळखपत्र online,मतदान ओळखपत्र आधार कार्ड,मतदान ओळखपत्र फोटो,मतदार ओळखपत्र फोटोसह डाउनलोड करा,मतदार ओळखपत्र
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS