औपचारिक शिक्षण न घेतलेल्या (पूर्वी शाळेत न गेलेल्या) किंवा औपचारिक शिक्षण अर्धवट सोडलेल्या घटकांना या योजने अंतर्गत प्राथमिक स्तर इयत्ता ५ वी, उच्च प्
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत मुक्त शिक्षण योजनेची प्रवेश सुरु
Admission to Open Education Scheme through Maharashtra
State Board of Open School
औपचारिक शिक्षण न घेतलेल्या (पूर्वी शाळेत न गेलेल्या) किंवा
औपचारिक शिक्षण अर्धवट सोडलेल्या घटकांना या योजने अंतर्गत प्राथमिक स्तर इयत्ता ५
वी, उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ८ वी समकक्ष परीक्षेसाठी संपर्क केंद्रामार्फत
नांव नोंदणी करता येईल.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय Maharashtra State Board of Open School मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता ५ वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ८ वी या परीक्षांना शासनाच्या नियमित परीक्षांची समकक्षता राहील.
मुक्त शिक्षण योजनेची वैशिष्टये
१. सर्वासाठी शिक्षणाची व्यवस्था.
२. सोयीनुसार शिक्षणाची संधी.
३. विषयांची लवचिकता.
४. संचित मूल्यांची व्यवस्था (Transfer of
Credits).
५. जादा व्यावसायिक विषयांची उपलब्धता.
६. अतिप्रगत विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणा पलिकडे अनेक
विषयांचे पर्याय उपलब्ध.
७. दिव्यांगासाठी विशेष विषय योजना.
८. तज्ज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन.
मुक्त शिक्षण योजनेचा अभ्यासक्रम व पाठयपुस्तके
१. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (
विद्याप्राधिकरण ), पुणे व महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक
निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती), पुणे व PSSIVE,
भोपाळ यांनी तयार केलेला प्रचलित अभ्यासक्रम व पाठयपुस्तके या
योजनेसाठी लागू राहतील. या पाठयपुस्तकांवर आधारीत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय
मंडळाने Maharashtra State Board of Open School तयार केलेले स्वयंअध्ययन साहित्य / पुस्तिका लागू रहातील.
२. कला विषयांतर्गत (१) सृजनात्मक कला निर्मिती (चित्रकला, हस्तकला, रंगकाम ), (२) भारतीय संगीत (गायन, वादन, नृत्य), (३) गृहोपयोगी व शालोपयोगी साहित्यनिर्मिती (दिव्यांगासाठी) या विषयांसाठी मुक्त विद्यालय मंडळामार्फत पाठयपुस्तके व स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले आहे.
१)अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती अचूक भरावी. (उदा. नाव, आधार
नंबर , मोबाईल नंबर, पत्ता, जन्मतारीख, ई – मेल, इयत्ता, संपर्क केंद्र ,माध्यम,
विषय,इ.)
२)मराठीतून माहिती भरण्यासाठी युनिककोड उपलब्ध करून दिलेला
आहे. त्यामुळे ती माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. तसेच आवश्यकतेनुसार
दुरूस्ती करून अंतिम करावे.
३)कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यानी स्कॅनर /
मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत . विद्यार्थ्यांचा मोबाईल
क्रमांक व ई–मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (Compulsory)
आहे.
४)संपूर्ण अर्ज भरून तो सबमिट करावा. तदनंतर उपलब्ध
होणार्याल PDF अर्जाची तसेच शुल्क पावती व हमी पत्राची दोन प्रतीत
प्रिंट काढून घ्यावी. विद्यार्थ्यांना अर्ज, विहित शुल्क व
मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र असलेल्या शाळा /
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावायची आहेत.
५)मुक्त विद्यालयामार्फत इयत्ता ५ वी / इयत्ता ८ वी साठी
प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्याची नावनोंदणी अर्ज शुल्क निर्धारित करण्यात आले
असून त्याची महिती चलनावर / महिती पुस्तिकेत उपलब्ध असेल.
६)मुक्त विद्यालयामार्फत ऑनलाईन पध्द्तीने नावनोंदणी
केलेल्या पात्र विद्यार्ध्यांना ऑनलाईन पध्दतीनेच नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment
Certificate) उपलब्ध करून देण्यात येईल.
७)मुक्त विद्यालय मंडळाने निश्चित केलेल्या संपर्क केंद्रावर
पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संपर्क शिबिरांचे आयोजन करण्यात
येईल.
८)संबंधित पात्र विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालय मंडळाने
तयार केलेल्या स्वयंअध्ययन पुस्तिका संपर्क केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येतील.
९)नावनोंदणी केलेल्या पात्र विद्यार्थ्याने संपर्क
शिबिरामध्ये उपस्थित राहून त्याने निवडलेल्या विषयनिहाय स्वयंअध्ययन पुस्तिका
सोडविणे आवश्यक आहे.
१०)विद्यार्थ्याने सोडविलेल्या स्वयंअध्ययन पुस्तिकांचे
मूल्यमापन संपर्क केंद्रावरील संबंधित तज्ञ शिक्षकांमार्फत तपासून व त्यावर आवश्यक
ते मार्गदर्शन व सूचना नमूद करतील.
११)मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता ५ वी / इयत्ता८ वी
च्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन निर्धारित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात येईल.
नोंदणी अर्जसोबत जोडावयाची कागदपत्रे –
१)शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळप्रत / द्वितीयप्रत
२)शाळेत गेला नसल्यास स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र(वय वर्ष १८
पेक्षा जास्त असल्यास स्वत:चे व वय वर्ष १८ पेक्षा कमी असल्यास पालकांचे )
३)आधारकार्ड
४)स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत: जवळ ठेवावा.
५)ऑनलाईन अर्ज भरताना सादर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड
करवयाची आहेत. (कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यानी स्कॅनर / मोबाईल द्वारे
कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत.)
Online प्रवेशाची कार्यपध्दती
सर्व प्रकारच्या Online प्रवेशासाठी
कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील. http://msbos.mh-ssc.ac.in या
वेबसाईटवर login करणे.
अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
http://msbos.mh-ssc.ac.in/Application_Form.aspx
- अर्ज भरण्याची भाषा निवडा (मराठी किंवा इंग्रजी )
- अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती अचूक भरावी. (उदा. स्वतःचे
नांव,
पत्ता, जन्मतारीख, आधार
क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी,
इयत्ता विषय माध्यम व संपर्क केंद्र क्रमांक इ.) त्या अर्जावर
अलीकडचा स्वतःचा फोटो scan करून Upload करावा व तो Submit करावा. मराठीतून माहिती
भरण्यासाठी युनिकोड उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे ती माहिती बरोबर असल्याची
खात्री करावी तसेच आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून माहिती अंतिम करावी.
- उमेदवाराने कागदपत्रे scan करण्यासाठी स्कॅनर /
मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते Upload करावे.
उमेदवाराने अर्जामध्ये मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी नोंदविणे
अनिवार्य (Compulsory) आहे.
- उमेदवार नावनोंदणी शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क
पुढील तीन कारे भरू शकेल. १ ) ऑनलाईन भरणा (Online Payment), २) NEFT व्दारे ३) संपर्क केंद्रावर रोखीने शुल्क
भरल्यास त्याची पावती उमेदवाराने संपर्क केंद्रावरून उपलब्ध करून घ्यावी.
- उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या नोंदणी अर्जाची प्रत (Printout ), नोंदणी शुल्क व इतर आवश्यक कागदपत्रे (मूळ प्रमाणपत्रांसह) संपर्क
केंद्रावर दोन प्रतीत त्वरित / निर्धारित मुदतीत जमा करावीत व एक प्रत स्वतःकडे
ठेवावी.
- पात्र उमेदवारास ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment
Certificate) उपलब्ध करून देण्यात येईल.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS