gpf slip online download,gpf slip online download maharashtra,gpf slip online download mp,gpf slip online download maharashtra pdf,gpf slip online dow
भविष्य निर्वाह निधीचे (GPF) लेखा स्लिप ऑनलाईन उपलब्ध
Account slip of Provident Fund (GPF) available online
महालेखापाल कार्यालय (A & E)-I, महाराष्ट्र,
मुंबई यांनी लेखा आणि कोषागार संचालकांना सन २०२३-२४ या वर्षासाठी
भविष्य निर्वाह निधी (GPF) लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत.
तसेच त्या राज्य सरकारच्या https://sevaarth.mahakosh.gov.in सेवार्थ संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचे (GPF)
सदस्य २०२३-२४ या वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीच्या स्लिप्स पाहण्यासाठी/डाउनलोडिंग/प्रिंटिंगसाठी या संकेतस्थळाचा वापर करु
शकतात, असे वरिष्ठ उप महालेखापाल (निधी) महालेखापाल (अ आणि
ई)-१, महाराष्ट्र, मुंबई यांनी
प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासकीय विभागच्या दि. ११
जून २०२० च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, भविष्य निर्वाह निधीची
विवरणप्रत प्रदान करण्याची प्रथा वर्ष २०१९-२० बंद करण्यात आली आहे.
खाते स्लिप्समध्ये जर काही विसंगती आढळल्या असतील तर संबंधित आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी), महालेखापाल (ए आणि ई) 1, मुंबई यांच्या निदर्शनास आणून देता येतील. तसेच हरवलेल्या क्रेडीट/डेबिटचे तपशील, जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख, स्लिपवर छापली नसल्यास, पडताळणी आणि अद्ययावतीकरणासाठी महालेखापाल (A & E)-1, महाराष्ट्र, मुंबई यांना त्वरित पाठवू शकता. त्याचप्रमाणे सदस्य विसंगतींचे तपशील, नोंदी, असे काही असल्यास इमेलद्वारे agaeMaharashtra1@cag.gov.in वर पाठवू शकतात, असे वरिष्ठ उप महालेखापाल (निधी) महालेखापाल (अ आणि ई)-१, महाराष्ट्र, मुंबई यांनी कळविले आहे.
GPF Slip सेवार्थ प्रणालीतून ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्यासाठी उपलब्ध सुविधा
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेख्यांबाबत महालेखापाल कार्यालयाकडून पुरविण्यात येणारी विवरणपत्रे ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक भनिनि-२०१९/प्र.क्र.६१/का २४. दिनांक ११/०६/२०२० व दिनांक २४/०९/२०२० अन्वये कळविण्यात आलेले आहे.
सदर भविष्य निर्वाह निधीचे लेखे सेवार्थ प्रणालीवरुन संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना प्रिंट घेता यावी म्हणून सेवार्थ प्रणालीत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. (Url: https://sevaarth.mahakosh.gov.in)
१) सेवार्थ प्रणालीवरील Employee corner साठी आवश्यक असलेल्या लांगीनने संबंधित अधिकारी / कर्मचारी (Sevaarth id with Password) लॉगीन करतील. (पासवर्ड रिसेट करावयाचा झाल्यास त्याची सुविधा आहरण संवितरण अधिकान्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे).
२)लॉगीन केल्यानंतर उपलब्ध असलेल्या मेनूमधील View GPF Sip या टॅबवर क्लिक करतील त्यानंतर त्यांना पुढील स्क्रीनवर GPF Slip for FY 2023-2024 असे दिसून येईल त्यानंतर Submit वा टॅबवर क्लिक करावे.
३) संबंधित अधिकारी कर्मचारी यांना Authentication करीता Series_Account number_DOB (YYYYMIMDD)_Sevaarth id ही माहिती भरावी. सदर भरलेला तपशील जर प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळला तर संबंधितांना GPF Slip Download करता येईल. जर सदर माहिती जुळली नाही तर संबंधितांना संबंधित AG Mumbai Or AG Nagpur यांचेकडे संपर्क करण्याबाबत प्रणालीवर संदेश दिसेल. त्याप्रमाणे संपर्क करण्यात येऊन GPF Slip प्राप्त करुन प्यावी. तसेच यापूर्वीच्या वित्तीय वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीचे लेखे महालेखाकार मुंबई व नागपूर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. याबाबतचे विचारणा करणारे ईमेल कृपया संचालनालयास पाठवू नये.
(४)सेवार्थ प्रणालीवर सदर GPF Slip ज्या अधिकारी / कर्मचारी यांचा सेवार्थ आवडी आहे अशा सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामध्ये सेवार्थ प्रणालीवर अटच नसलेले कर्मचारी सुध्दा Employee Corner चा वापर करून GPF Slip Download करता येणार आहे.
५)सेवार्थ प्रणालीवर अटच नसलेले कर्मचारी म्हणजे, ज्या शासकीय कार्यालयात नियमित सेवार्थ प्रणालीशिवाय वेतन अदा होत असलेले कर्मचारी अथवा प्रतिनियुक्तीच्या पदावर पदस्थापना असलेले कर्मचारी तसेच अद्याप कोणत्याही कार्यालयात पदस्थापना प्राप्त नसलेले कर्मचारी आहेत.
६)कर्मचाऱ्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे त्यांना Employee Corner व्दारे GPF Slip Download करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. जर अशा कर्मचाऱ्यांना GPF Slip Download करताना काही अडचणी आल्यास त्यांनी प्रत्येक कोषागारात उपलब्ध असलेल्या तांत्रिक सहाय्यकाच्या ईमेलवर पुढील तपशीलानुसार माहिती देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यातील तांत्रिक सहाय्यकाचा ईमेल आयडी सेवार्थ प्रणालीच्या लांगीन पेजवर Contact Us (Sevaarth Contact details) या टॅबवर उपलब्ध आहेत.
- · कर्मचान्यांचे पूर्ण नाव
- · सेवार्थ आयडी व पासवर्ड (Employee Corner Login)
- · संबंधित महालेखाकार कार्यालय मुंबई नागपूर
- · भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक (Series_Account number)
- · अचूक जन्मतारीख (1" page of Service book Scan copy)
उपरोक्त तपशीलाव्दारे महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पडताळणी करण्यात येईल व जर अशा कर्मचान्यांची माहिती महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेली असेल तरच ती संबंधित कर्मचान्यांला उपलब्ध करण्यात येईल अन्यथा अशा कर्मचान्याला संबंधित महालेखापाल कार्यालयास संपर्क साधण्यास कळविण्यात येईल.
gpf slip,gpf slip mp,gpf slip download,gpf slip latur,gpf slip cg,gpf slip mumbai,gpf slip nagpur,gpf slip mp,gpf slip mpeb,gpf slip mp agmp login,gpf slip mp online download,gpf slip mp online login,gpf slip mp 23-24,gpf slip mp 2022-23 telangana,gpf slip mp teacher,gpf slip mp treasury,gpf slip mp teacher pdf,gpf slip online download,gpf slip online download maharashtra,gpf slip online download mp,gpf slip online download maharashtra pdf,gpf slip online download nagpur,gpf statement online download,tamil nadu gpf slip download online,gpf slip online download maharashtra
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS