10 वी, 12 वी परीक्षा प्रवेशपत्र मिळणार ऑनलाईन | 10th, 12th exam admit card will be available online
10 वी, 12 वी परीक्षा प्रवेशपत्र मिळणार ऑनलाईन | 10th, 12th exam admit card will be available online
माध्यमिक (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी)
जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय
मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.
[दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 चे वेळापत्रक जाहीर]
विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून
हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉलतिकीट/प्रवेशपत्रे ऑनलाईन
पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर
मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही
शुल्क आकारण्यात येणार नाही. हॉल तिकीटामध्ये विषय व
माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी
त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा
उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव
शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url