शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ वेळापत्रक,Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2024 Time Table
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ वेळापत्रक
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून शासकीय
रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या, तथापि,
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, अधिनियम
२०२३ दि. २३/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण
मंडळ अधिनियम, २०२३ कलम ८ मधील तरतुदीनुसार सन २०२४- २०२५
पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) (Government Drawing (Elementary and Intermediate Drawing Grade) परीक्षा, मंडळाकडून घेण्यात येणार आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास दिनांक
१६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) (Government Drawing (Elementary and Intermediate Drawing Grade)परीक्षा २०२४, दिनांक
२५ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या तारखा
- केंद्रांची नोंदणी / केंद्राची माहिती अद्यावत करणे ऑनलाईन पध्दतीने- ०१.०८.२०२४ ते ०५.०८.२०२४ पर्यंत
- केंद्राच्या अधिनस्त असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी-०१.०८.२०२४ ते ०५.०८.२०२४ पर्यंत
- एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या दिनांक-०५.०८.२०२४ ते ३१.०८.२०२४ पर्यंत.
- परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी
दिनांक-१४.०८.२०२४ ते ३१.०८.२०२४ पर्यंत.
संबंधित सर्व केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय
रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी
किंवा इंटरमिजिएट ) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General
Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय
रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी
व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने https://www.msbae.org.in संकेतस्थळावर
भरावयाची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित
विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला
परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे. या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने
करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा - २०२४ वेळापत्रक
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक 2024 | Elementary Drawing Grade Exam Time Table 2024
विषयाचे नाव | परीक्षेची वेळ |
---|---|
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा - बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ | |
1) वस्तुचित्र (Object Drawing) | १०.३० ते १.०० (२.३० तास) |
2) स्मरणचित्र (Memory Drawing) | २.०० ते ४.०० (२.०० तास) |
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा - गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ | |
3) संकल्पचित्र-नक्षीकाम (Design) | १०.३० ते १.०० (२.३० तास) |
4) कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (Plane Geometry & Lettering) | २.०० ते ४.०० (२.०० तास) |
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक 2024 | Intermediate Drawing Grade Exam Time Table 2024
विषयाचे नाव | परीक्षेची वेळ |
---|---|
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा - शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ | |
1) स्थिरचित्र (Still Life) | १०.३० ते १.३० (३.०० तास) |
2) स्मरणचित्र (Memory Drawing) | २.३० ते ४.३० (२.०० तास) |
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा - शुक्रवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ | |
3) संकल्पचित्र-नक्षीकाम (Design) | १०.३० ते १.३० (३.०० तास) |
4) कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन (Geometry, Solid Geometry & Lettering) | २.३० ते ५.३० (३.०० तास) |
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS