OrdinaryITPostAd

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान | शाळा मूल्यांकन नवीन वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२: एक व्यापक अभियान टप्पा-१ चे यशस्वी परिणाम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-१ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान | शाळा मूल्यांकन वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियान | शाळा मूल्यांकन नवीन वेळापत्रक

 स्पर्धात्मक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी

तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. ही रक्कम शाळांच्या गरजेनुसार वापरण्यासाठी शाळा व्यवस्थापनास मुभा

देण्यात आली. त्यामुळे शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले. विविध प्रकारचे स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळाली. अभियानाचा मूळ हेतू विद्यार्थ्यांना बाह्य जगाची ओळख करून देणे होता आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य झाला.

माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियानाची उद्दिष्टे

  • शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करणे: विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.
  • शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे: शाळांच्या प्रशासनाचे बळकटीकरण करणे.
  • शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे: शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या घटकांचा विकास करणे.

माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियानाचा कालावधी

  • ·        दि. २९ जुलै ते दि. ०४ ऑगस्ट, २०२४: पूर्व तयारीसाठी अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचविणे.
  • ·        दि. ५ ऑगस्ट २०२४: औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल.
  • ·        दि. ०४ सप्टेंबर २०२४: अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.
  • ·        दि. ०५ सप्टेंबर २०२४ ते दि. १५ सप्टेंबर २०२४: मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ: योग्य दिनांकावर संपन्न होईल.

माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियानाचे स्वरूप

माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल:

  • - पायाभूत सुविधा: ३३ गुण
  • - शासन ध्येय धोरण अंमलबजावणी: ७४ गुण
  • - शैक्षणिक संपादणूक: ४३ गुण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ (Majhi Shaala Sundar Shaala Tappa 2) हे अभियान शाळांमध्ये नवचैत्यन निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे अभियान विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव मिळवण्यासाठी उत्तम संधी देईल.

[मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी उपक्रमासाठी घोषवाक्य]

माझी शाळासुंदर शाळा टप्पा-२ अभियानाचे निकष -

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२


  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम