⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२४ आयोजन

राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२४ आयोजन Rajarshi Shahu Maharaj Essay Competition 2024

राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२४ आयोजन

Rajarshi Shahu Maharaj Essay Competition 2024

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४आयोजन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्वसंपन्न कारकीर्द ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरली आहे. सुख बिलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानाच्या शाहू महाराजांनी उपभोगशून्य स्वामित्त्व गाजविले. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडविण्यासाठी त्यांनी महत् प्रयास केले. जनतेच्या सर्वांगीण उत्पत्तीचे त्यांनी स्वप्न पाहिले व ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्याथ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्याथ्र्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी. यासाठी सारथी संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्याथ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिकास्तरीय निबंध स्पर्धा २०२४आयोजित करण्यात येत आहे. ही निबंध स्पर्धा पुढील ४ वर्ष चालू ठेवण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.

[सारथी शिष्यवृत्ती २०२४-२५ अर्ज | Sarathi Scholarship 2024-25 Application]

सारथी सस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. ३ री ते ५ वी तसेच इ. ६ वी ते इ. ७ वी व ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी सदरची स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व तालुका व महानगरपालिका स्तरावर घेण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी-

गट क्र.१:- इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी

विषय:- 

अ) राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण.

ब) राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग. शब्द मर्यादा १०० शब्द

गट क्र. २:- इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी

विषय:- 

अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य.

ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य.

शब्द मर्यादा :- ३०० शब्द

गट क्र. ३ :- इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी

विषय:- 

अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ.

ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य.

शब्द मर्यादा - ५०० शब्द

१. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ आयोजनाची दि. १५ जुलै २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ ही आहे. या कालावधीत निबंध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व म.न.पा स्तरावर प्रशासनाधिकारी यांनी करावे.

२. तालुकास्तरीय निबंध स्पर्धा गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी करावे.

३. म.न.पा स्तरावर गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन प्रशासनाधिकारी (शिक्षण) यांनी करावे.

४. छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्य सर्व विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेत सहभागी करून घ्यावे म्हणून निबंधस्पर्धा तालुका स्तरावर तसेच मनपा स्तरावर घेण्यात येत आहेत. प्रत्येक गटात प्रत्येक तालुक्यातील किमान १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी करावे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी तसेच प्रशासनाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी.

५. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व माध्यमाच्या सर्व मान्यताप्राप्त शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे.

६. निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल.

७. विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत असलेल्या इयत्तानिहाय गटातून एकाच विषयावर स्वतः निबंध लिहावानिबंधावर विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, इयत्ता. शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा. तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी.

८. प्रत्येक शाळेतील निबंध स्पर्धेत सहभागी होणान्या सर्व विद्यार्थ्यांचे निबंध शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी एकत्रित करावेत व तद्नंतर सदर निबंध शाळेच्या लेटर हेडवर मुख्याध्यापकांच्या शिफारशीने व सही शिक्क्यानिशी सदर निबंध गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी म.न.पा यांना दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करावेत.

९. निबंध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणा-या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्याथ्र्यांना त्यांचे बँक खातेवर बक्षिसाची रक्कम सारथी. पुणे मार्फत अदा केली जाणार असल्याने संबंधित विद्याथ्यांचे स्वतःचे नावे राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते असलेल्या पहिल्या पानाची सत्यप्रत निबंधासोबत जमा करणे आवश्यक आहे.

१०. सारथी मार्फत तालुकानिहाय व मनपानिहाय यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रत्येक तालुका व म.न.पा कार्यालयाकडे प्रशस्तीपत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील.

राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ आयोजन Rajarshi Shahu Maharaj Essay Competition 2024

११. तालुका स्तरावरील निबंध स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी तीन तज्ञ परीक्षक शेजारच्या तालुक्यातील नियुक्त करावेत. त्यांचेकडून निबंध स्पर्धेचे परीक्षण करून १ ते १० क्रमांक घोषित करावेत. निबंध स्पर्धेचे परीक्षण- आशय- २५ गुण.अभिव्यक्ती - ५ गुण. भाषाशैली- ५ गुण. शुद्धलेखन- ५ गुण. वळणदार हस्ताक्षर व प्रभाव - १० गुण एकूण ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करावे.

१२. निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तिन्ही गटातील प्रत्येकी गुणानुक्रमे १ ते १० विद्याथ्यांची यादी सारथी संस्थेस ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करावी. (त्यामध्ये विद्यार्थ्याचे नांव. शाळेचे नांव व पत्ता, ई-मेल. स्पर्धेचा विषय प्राप्त क्रमांक, विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक. बँक तपशील. नांव, खाते क्रमांक. IFSC Code, बँकेचे नांव, शाखा इ. माहिती सादर करावी.) तसेच व पारितोषिक प्राप्त असणा-या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे निबंध सारथी कार्यालयास सादर करावेत.

१३. निबंधस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या १ ते ३ गटातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी. 

लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे.

A) गट क्रमांक १ इयत्ता ३ री ते ५ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.gle/Nrv2RahgG4f2aTiva ही लिंक आहे.

B) गट क्रमांक २ इयत्ता ६ वी ते ७ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.gle/vYJ3LV1pF6WMA597 ही लिंक आहे.

C) गट क्रमांक ३ इयत्ता ८ वी ते १० वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.gle/CSJy5k26fRduAP306 ही लिंक आहे.

१४. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी निबंधस्पर्धा संपन्न होताच स्पर्धेविषयी आपला संक्षिप्त अहवाल निकाल पत्रकासोबत पुढील नमुन्यात सादर करावा. तसेच सदर स्पर्धेविषयी आपला अभिप्राय सुमारे १० ओळीत सही शिक्क्यासह सादर करावा.

१५. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निबंध स्पर्धेचा निकाल व स्पर्धा सहभाग अहवाल सह व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी उपकेंद्र बचत गंगा इमारत कसबा बावडा रोड, रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर ४१६००३ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावा.

१६. प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक निबंध (गट क्र. १ ते ३) मिळून प्राप्त होणान्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासनाधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सारथी मार्फत गौरविण्यात येईल.

१७. छत्रपती शाहू महाराज निबंधस्पर्धेविषयी उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत.

शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना या निबंधस्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी मनपा मार्फत परिपत्रकाद्वारे व आढावा बैठकीद्वारे सर्व शाळांना कळविण्यात यावे. प्रत्येक तालुक्यातून व मनपा स्तरावरून प्रत्येक गटातून किमान १००० निबंध इयत्ता ३ री ते ५वी. ६ वी ते ७ वी ८ वी ते १० वी) प्राप्त होतील याबाबतचे नियोजन गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांनी करावे.

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम