“शिक्षण सप्ताह " 22 ते 28 जुलै दरम्यान आयोजन,राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्ष
“शिक्षण
सप्ताह " 22 ते 28 जुलै दरम्यान आयोजन
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन
दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत
"शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत कळविण्यात
आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित
करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध
पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक,
धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
शिक्षण सप्ताह अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस वेबिनार
सत्र Live
शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत
संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.
दिनांक | उपक्रम |
---|---|
सोमवार, दि. २२ जुलै, २०२४ | अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) ( परिशिष्ट १) |
मंगळवार, दि.२३ जुलै, २०२४ | मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (परिशिष्ट २) |
बुधवार, दि. २४ जुलै | क्रीडा दिवस (Sports Day) (परिशिष्ट ३) |
गुरुवार, दि. २५ जुलै, २०२४ | सांस्कृतिक दिवस (Cultural Day ) ( परिशिष्ट ४) |
शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४ | कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (परिशिष्ट - ५अ &५ब) |
शनिवार, दि.२७ जुलै, २०२४ | मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम/ शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LiFE / School Nutrition Day) (परिशिष्ट ६) |
रविवार, दि. २८ जुलै, २०२४ | समुदाय सहभाग दिवस ( Community involvement Day) |
मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.
तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे. तसेच उद्याच्या नियोजित उपक्रमांचे देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात यावे. *या सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत* असताना *#ShikshaSaptah #NEP2020 #PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy #Scertmaharashtra* या हॅशटॅगचा वापर करावा.
शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS