एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना एकच निवड वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील शासन सकारात्मक आहे.
एकाच वेतनश्रेणीतील शिक्षकांना एकच निवड वेतनश्रेणी
देण्याबाबत शासन सकारात्मक – शालेय शिक्षणमंत्री
एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या
शिक्षकांना एकच निवड वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील शासन सकारात्मक आहे.
यासंदर्भातील अहवाल केंद्र शासनाकडून मागविण्यात आला आहे. अहवालाअंती कार्यवाही
करण्यात येईल. तसेच आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यासंदर्भात शासन
सकारात्मक असून, त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री दीपक
केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यातील २० टक्के शिक्षकांनाच निवड वेतनश्रेणी देण्याची अट ठेवल्याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यात एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ
वेतनश्रेणी आणि २४ वर्षे पूर्ण झालेल्या २० टक्के शिक्षकांना निवड वेतनश्रेणी लागू
करण्यात येत आहे. मात्र सरसकट एकाच वेतनश्रेणीतील सर्व शिक्षकांना समान निवड
वेतनश्रेणी देण्याबाबत केंद्र सरकारकडे अहवाल मागविण्यात आला आहे. यासंदर्भात शासन
सकारात्मक निर्णय घेणार आहे. तसेच, आश्वासित प्रगती
योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली. त्याप्रमाणे शिक्षकांनाही द्यावी यासदंर्भात
बक्षी समितीने निर्णय लागू केल्याने याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याची
माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS