महाराष्ट्रातील युवक - युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी,[जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे] [जर्मन भाषा शिकण्यास व शिकविण्यास इ
महाराष्ट्रातील युवक - युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी
Employment opportunities in Germany for the youth of Maharashtra; युरोपियन युनियन मधील बहुतांशी देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न
आहेत. तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, शिवाय
जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थार्जन होत नसल्याचे दिसून आले
आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियन मधील
देशांना करता यावा व त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येऊन
त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सदृढ होतील व
अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात
परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा दृष्टीकोन आहे. यासाठी मा. मंत्री
(शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाच्या दि.३१.०५.२०२३ रोजीच्या
संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये कृतीदलाचे गठन करण्यात आले होते. या
कृतीदलात या विभागाबरोबरच उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास
व उद्योजकता, उद्योग, कृषी व वैद्यकीय
शिक्षण या विभागांच्या मा. मंत्री महोदयांचा व सचिवांचा समावेश आहे. कुशल
मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्याची जबाबदारी या
कृतीदलाकडे सोपविण्यात आली होती. सन २०१५ मध्ये जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या
राज्याशी Sister State Relationship अंतर्गत महाराष्ट्र राज्याने
कौशल्य वृध्दीबाबत सामंजस्य करार केला असल्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन व या
राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज विचारात घेऊन त्या राज्यास कुशल मनुष्यबळाचा
पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांती कृती दलाने त्या दृष्टीने प्रयत्न केले.
यासाठी दोन्ही बाजूच्या बैठका संपन्न झाल्या. बाडेन- वुटेनबर्ग या राज्याशी
सामंजस्य करार करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयास सादर करण्यात आला व त्यांच्या मान्यतेनंतर दोन्ही राज्यातील
प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.२५.०२.२०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
हा करार करण्यात आल्यानंतर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेली
क्षेत्रे निश्चित करणे, प्रत्यक्ष काम करण्यासाठी किमान कौशल्याची
निश्चिती करणे, कुशल मनुष्यबळाच्या स्थानांतरणासाठी व्हिसा व
रहिवास याबाबत धोरण निश्चिती, जर्मन भाषेचे व आवश्यक
शिष्टाचाराचे प्रशिक्षण इत्यादी अनेक बाबतीत निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी मा.
मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागातील उच्च पदस्थ
अधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ दि.११.०६.२०२४ ते दि.१५.०६.२०२४ या कालावधीत
बाडेन वुटेनबर्ग या राज्याच्या दौऱ्यावर होते.
अर्थात वर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व बाबींसाठी काहीसा
कालावधी लागणार आहे हे स्पष्ट आहे. तथापि, आरोग्य क्षेत्रासह परिवहन,
विविध उद्योगातील तंत्रज्ञ इत्यादीसाठी कुशल मनुष्यबळाचा पुरवठा
प्राधान्याने होणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पथदर्शी तत्वावर
सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १०,००० कुशल मनुष्यबळ
तातडीने त्या राज्यास उपलब्ध करुन द्यावे असे प्रस्तावित होते. या विभागामार्फत
यापूर्वी उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली
जात असे. या योजनेनुसार शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार,
उद्योग व व्यवसाय यासाठीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट
बाळगण्यात आले होते.
उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण या योजनेचा विस्तार
करून जर्मनीतील बाडेन- बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील खालील विविध
क्षेत्रातील १०,००० कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी
प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था व
कार्यपध्दती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
www.aapalathakare.com | www.nextupdates.in |
---|---|
Professions in Healthcare | Professions in Hospitality |
I. Nurse (Hospital)/ Medical assistants (MFA) II. Lab assistant III. Radiology assistant IV. Dental assistant V. Care giver to sick and senior citizens VI. Physiotherapists VII. Documentation and coding / Third party administration VIII. Accounting and Administration | I. Servers / Waiters II. Receptionists III. Cooks IV. Hotel managers V. Accountants VI. Housekeepers / Cleaners |
Professions- Craftsmen | Miscellaneous |
I. Electricians II. Electricians specialized in renewable energies III. Heating technicians IV. Painters V. Carpenters VI. Brick / tile layers Mason VII. Plumbers VIII. Mechanics for vehicle repairs (light and heavy Vehicle) | I. Drivers (bus / tram / train / truck) II. Security III. Delivery (postal service) IV. Packers and movers V. Support at Airport – Cleaners / baggage handlers VI. Housekeeping VII. Sales assistants VIII. Ware-house assistance |
[जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे]
[जर्मन भाषा शिकण्यास व शिकविण्यास इच्छुक शिक्षकांनी येथे क्लिक करावे]
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS