केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती, एकतर,केंद्र प्रमुख,केंद्र प्रमुख वेतनश्रेणी,केंद्र प्रमुख जॉब चार्ट,केंद्र प्रमुख भरती अभ्यासक्रम,केंद्र प्रमुख भरती श
केंद्रप्रमुख | प्राथमिक शाळेतील
मुख्याध्यापक | अधिसूचना
१. केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती, एकतर
(१) पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा
वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित
पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, पात्रतेच्या
अधीन राहून, ज्येष्ठतेच्या आधारे, योग्य
व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.
(२) शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार, त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने,
[केंद्रप्रमुख पद भरती,अभ्यासक्रम,शासन निर्णय,पदोन्नती माहिती]
(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त
विद्यापीठातून बी.ए. किंवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. ची पदवी धारण केलेली आहे;
(ब) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित
शिक्षक (प्राथमिक) म्हणून जिल्हा परिषदेत किमान सहा वर्षे अखंड सेवा केली आहे;
२. केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे
अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.
२. (१) केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या
व्यक्तींनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५
मधील तरतुदींनुसार | किंवा याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित
केलेले अन्य नियम आदेश किंवा इतर संसाधनानुसार लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर
करणे आवश्यक आहे.
(२) लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर केल्याच्या दिनांकास
दोनपेक्षा अधिक मुले असलेली व्यक्ती या नियमांनुसार नियुक्त केलेल्या सेवेत
नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
(३) या नियमानुसार नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीची
शासन सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, अशा व्यक्तीस नियुक्तीच्या
वेळी किंवा त्यांनंतर त्याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्यास,
ती या पदावर सेवा चालू ठेवण्यासाठी अपात्र ठरेल.
४. केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता
यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल.
[केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम | syllabus of Kendra-Pramukh Exam]
५. केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती;
(१) तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
(प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर कार्यरत असेल त्याच
जिल्ह्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल;
(२) तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
(प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून काम करत आहे त्या
जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये
प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही.
६. या नियमान्वये
केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि
पंचायत समित्या अधिनियम, १९६१, महाराष्ट्र
जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील
तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम, आदेश किंवा कोणतीही संसाधने लागू राहतील.
[मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच]
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS