राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMSS) सन २०२४-२५, nmmss scholarship,nmmss scholarship 2024,nmmss scholarship result 202,nm
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMSS) सन २०२४-२५ साठी पूर्वतयारी व अंमलबजावणी
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही
केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत
शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या
परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
शासन निर्णय क्र. २० ऑगस्ट, २०१८ पासून NMMSS परीक्षेत
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ वी ते इ.१२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु.१,०००/- प्रमाणे ( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती
मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in
या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांने नवीन व
नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने
भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व
जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी
पात्र सर्व विद्याथी / विद्यार्थीनींचे अर्ज NSP
2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत
प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या
माहितीचे फलक लावण्यात यावेत.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी सन २०२४- २५ साठी नवीन व
नूतनीकरण विद्यार्थ्याचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP
2.0 या पोर्टलवर सुरू करण्यात आल्यानंतर स्वतंत्रपणे कळविण्यात
येईल.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ( NMMSS) शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT
(Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थी /
विद्यार्थीनींच्या आधार लिंक बँक खात्यावर होत असल्याने विद्याथी /
विद्यार्थीनींचे आधार कार्ड असणे व विद्यार्थी / विद्यार्थीनींच्या बँक खात्यास
लिंक असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल
घटक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे -
Nmmss पात्रतेचे निकष -
१. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.
२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर
योजना लागू आहे. ३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय
तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या
शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी
अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक
विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील
शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.
५. इयत्ता १० वी मध्ये सर्वसाधारण (जनरल)
विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यास ०५
टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये
गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.
६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे
७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड
असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.
८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे
त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.
९. विद्यार्थ्याकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा
शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात
येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
१०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या
आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्यांची
शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या
शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.
११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षांचे
अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या
नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित
केली जाऊ शकत नाही.
१२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष
संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला
जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे /
प्रमाणपत्रे -
१. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड
सर्टिफिकेट .
२. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन.एम.एम.एस.
परीक्षेचे गुणपत्रक.
३. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे
(इयत्ता ९वी, १०वी, ११वी)
गुणपत्रक.
४. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. ३,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा
दाखला.
५. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती
परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा
दाखला.
६. आधार कार्ड प्रत.
सन २०२४-२५ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर एका विद्यार्थ्याला कोणतीही एका शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. तसेच कॉमन स्टँडर्ड अॅप्लिकेशन फॉर्म एन. आय. सी कडून विकसित करण्यात आलेला आहे. तसेच केंद्र शासनाकडून लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये Aadhar base Payment System (ABPS) द्वारेच शिष्यवृत्ती जमा करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आधार हा ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक आहे. एन.एस.पी पोर्टलवर विद्यार्थ्याच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये डॅशबोर्ड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वेळोवेळी SMS द्वारे अपडेट्स पाठविले जातील.
विद्याथी /
विद्यार्थीनींचे नविन अर्ज रजिस्टर करण्यासाठी :-
१. एन. एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये New Registration या लिंकवर क्लिक करणे.
२. सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा व Continue बटणावर क्लिक करा.
३. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असेल तर I have Aadhar हा पर्याय निवडणे, विद्यार्थ्याचे आधारकार्ड नसेल पण आधारसाठी विद्यार्थ्याने नोंदणी केली
असल्यास Aadhar not assigned (I have EID) हा पर्याय निवडणे,
विद्यार्थ्याचे आधारकार्ड नसल्यास तसेच नोंदणी देखील केली नसल्यास I
don't have Aadhar EID हा पर्याय निवडणे.
४. विद्यार्थ्याचा / पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद
करावा. मोबाईलवर OTP प्राप्त
करण्यासाठी Get OTP या बटणावर क्लिक करावे.
५. OTP टाईप करुन Verify या बटणावर क्लिक करावे.
६. आधारवरील सर्व माहिती तपासण्यात यावी.
७. स्कॉलरशिप Type
मध्ये स्कॉलरशिप स्किम निवडा.
८. स्कॉलरशिप Category
मध्ये इयत्ता ९वी, १०वी साठी प्रि-मॅट्रिक
निवडा व इयत्ता ११वी, १२वी साठी पोस्ट मॅट्रिक निवडा.
९. State
Of Domicile मध्ये विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवाशी आहे ते राज्य
निवडा.
१०. Father Name मध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव, Mother Name मध्ये विद्यार्थ्यांच्या आईचे नाव, विद्यार्थ्याचा ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी भरुन रजिस्टर या बटणावर क्लिक करणे. ११. विद्यार्थ्यास रजिस्ट्रेशन / अॅप्लिकेशन आयडी मिळेल. सदर आयडी जतन करुन ठेवावा.
विद्याथी /
विद्यार्थीनींचे नविन अर्ज भरण्यासाठी :-
१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये Fresh Application या लिंकवर क्लिक करणे.
२. विद्यार्थ्याचा अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड
टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा. (रजिस्टर मोबाईलवर SMS द्वारे आयडी व पासवर्ड प्राप्त होतो.)
३. रजिस्टर मोबईलवरील प्राप्त OTP टाकून Confirm OTP या बटणावर
क्लिक करा.
४. विद्यार्थ्याचा अर्ज भरण्यासाठी Application Form या मेनूवर क्लिक करा.
५. General
Information मध्ये आधार नुसार विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग भरावे.
६. धर्म, जात, पालकांचे वार्षिक उत्पन्न, विद्यार्थी Day scholar / hosteller हे नमूद करावे.
७. Academic
Details मध्ये विद्यार्थ्यांची शाळा निवडण्यासाठी Select
Your Institute या बटणावर क्लिक करावे.
८. शाळेच्या यु-डायस नुसार शाळा शोधून Select या बटणावर क्लिक करावे.
९. विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष हजेरी क्रमांक, तुकडी, सध्या शिक्षण घेत असलेली इयत्ता, शाळा सुरु झालेली तारीख, मागील इयत्ता, पास झालेले वर्ष, मागील इयत्तेमधील गुणांची टक्केवारी इ. माहिती भरावी.
१०. Competitive
Exam Qualified मध्ये NMMS निवडावे.
११. Exam
Conducted by मध्ये विद्यार्थ्याने ज्या राज्यातून परीक्षा दिली आहे
ते राज्य निवडावे.
१२. Competitive
Exam Roll No मध्ये NMMS रिझल्ट मधील सीट
क्रमांक नमूद करावा (फक्त अंकी असाव. उदा. ३३९२••••••)
१३. Competitive
Exam Year मध्ये '2023' नमूद करावे.
१४. Other
Details मध्ये विद्यार्थी अनाथ असल्यास पालकांचे नाव, विद्यार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रकार, UDID क्रमांक दिव्यंगत्वाचा प्रकार दिव्यांगाची टक्केवारी, पालकांचा व्यवसाय इ. माहिती भरुन Save & Continue या बटणावर क्लिक करावे.
१५. Contact
Details मध्ये जिल्हा, शहर / ग्रामीण, संपूर्ण पत्ता व पिनकोड नमूद करावा.
१६. विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे
केंद्रशासनाच्या कोणकोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो याची यादी दिसेल.
त्यामधील विद्यार्थ्यास आवश्यक असलेली शिष्यवृत्ती योजना निवडण्यात यावी.
१७.Upload
Document मध्ये विद्यार्थ्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, गुणपत्रक इ. कागदपत्रे अपलोड करावी. (फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान
असावी. )
१८. Print Your Application या मेनूवर क्लिक करुन विद्यार्थ्याच्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज व कागदपत्रे शाळेमध्ये जमा करण्यात यावी. शाळेने सदर कागदपत्रे किमान ०५ वर्षे जतन करुन ठेवावीत.
विद्यार्थी / विद्यार्थीनींचे नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी :-
१. एन. एस. पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये Renewal Application या लिंकवर क्लिक करणे.
२. विद्यार्थ्याचा अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड
टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा.
३. विद्यार्थी/विद्यार्थीनींनी शाळा बदलली असल्यास
Update Institute या बटणावर क्लिक
करावे. त्यानंतर Select Your Institute या बटणावर क्लिक करुन
शाळेच्या यु-डायस नुसार शाळा शोधून Select या बटणावर क्लिक
करुन शाळा निवडावी व Update या बटणावर क्लिक करावे.
४. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे E-KYC करण्यासाठी Update E-KYC OTP या बटणावर क्लिक करुन आधार लिंक मोबाईल क्रमांकावरील प्राप्त OTP च्या आधारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी किंवा Face
Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण
करावी. (Face Authentication साठी मोबाईल वर गुगल प्ले
स्टोअर मधून NSP FaceAuth हे अॅप्लिकेशन Install करावे व विद्यार्थ्याचे लॉगिन करुन Face Authentication प्रक्रिया पूर्ण करावी.)
५. विद्यार्थी/विद्यार्थीनीचा नूतनीकरणाचा अर्ज
भरण्यासाठी Apply for Renewal या मेनूवर क्लिक
करावे..
६. पालकांचे वार्षिक उत्पन्न, Day scholar / hosteller, शाळा सुरु झालेली तारीख,
मागील इयत्तेतील गुणांची टक्केवारी, विद्यार्थ्याचा
जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष हजेरी क्रमांक, तुकडी इ. माहिती नमूद करावी.
७. Upload
Document मध्ये विद्यार्थ्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र अपलोड करावी.
(फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान असावी.)
८. Save
as Draft या बटणावर क्लिक करावे.
९. भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करुन Final Submit या बटणावर क्लिक करावे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
COMMENTS