National Space Day organized in school | Chandrayaan - 3; भारत सरकारने 'शिवशक्ती' येथे विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सहज लँडिंग पूर्ण करणाऱ्या चांद्रयान
राष्ट्रीय अंतराळ दिवस शाळेमध्ये आयोजन | चांद्रयान
- ३
National Space Day organized in school | Chandrayaan - 3; भारत सरकारने 'शिवशक्ती' येथे विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सहज लँडिंग पूर्ण करणाऱ्या चांद्रयान - ३
मोहिमेच्या यशाच्या स्मरणार्थ दरवर्षी दि. २३ ऑगस्ट हा "राष्ट्रीय अंतराळ
दिवस" घोषित केला आहे. भारताच्या राजपत्रात दि.२३/०८/ २०२४ रोजी राष्ट्रीय
अंतराळ दिवस साजरा करण्याबाबतची घोषणा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत
सरकार यांनी शाळा, प्रशिक्षण संस्था आणि अध्यापन
विद्यालयामध्ये खालील विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्याविषयी पत्रात नमूद केले
आहे.
[चांद्रयान-3 बद्दल संपूर्ण महिती | Complete information about Chandrayaan-3]
गेल्या वर्षी चांद्रयानावर आधारित १० इयत्ता निहाय विशेष
मॉड्यूल्स https://bharatonthemoon.ncert.gov.in/inspiringstories या
पोर्टलवर उपलब्ध आहेत. NCERT च्या https://ncert.nic.in/chandrayaan.php
या विशेष मॉड्यूल्सचे १३ प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात
आलेले आहे. हे स्पेशल मॉड्यूल्स विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात
यावेत. विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये
सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच दि. २३/०८/२०२४ रोजी @NCERTOFFICIAL
या युट्युबच्या चॅनेलवरील राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२४ शी संबंधित
सर्व व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावेत
सर्व शाळा / प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. २३/०८/२०२४ रोजी
चांद्रयान मॉड्युल्स, ISRO चे अंतराळ मोहिमेत मिळवलेले यश उदा.
आदित्य, अवकाश तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर आधारित विशेष
प्रशिक्षण/ कार्यशाळा/ प्रात्यक्षिक / व्याख्यान आयोजित करण्यात यावेत.
[23 ऑगस्ट रोजी पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस]
भारत ऑन द मून पोर्टल गेल्या वर्षी लाँच करण्यात आले होते. NCERT च्या वेबसाईटवर लवकरच अंतराळ (Space) या थीमवर
आधारित ई-मासिक प्रकाशित करण्यात येणार आहे. ई-मासिक जास्तीत जास्त
शाळा/विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे.
[Chandrayaan-3 | चांद्रयान-3 सॉफ्ट-लँडिंग टेलिकास्ट]
ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अंतराळ या थीमवर आधारित विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी शाळांनी एखाद्या तज्ञ व्यक्तीला आमंत्रित करण्यात यावेत.
सर्व शाळांमध्ये अंतराळ या थीमवर आधारित प्रतिकृती बनवणे, प्रश्नमंजुषा
स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.
तसेच, शाळांनी चांद्रयान आणि इतर अंतराळाशी
संबंधित मोहिमेत मिळवलेले यश जसे की आदित्य इत्यादींवर आधारित इयत्ता निहाय उपक्रम
(उदा. प्रश्नमंजुषा इ.) आयोजित करण्यात यावेत. शाळांनी शिक्षक/ विद्यार्थ्यांना
मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि अंतराळ (Space)
संबंधी आवड आणि जाणीवजागृती वाढवण्यासाठी शिक्षक / विद्यार्थी यांची
२ मिनिटाची रील बनवावी / २ मिनिटांचा व्हिडीओ बनवावा.
अंतराळ विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) क्युरेटेड
ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य DIKSHA, NISHTHA, PME विद्या चॅनेलवर अपलोड
करण्यात आले आहे.
आपल्या देशातील राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२४ च्या शैक्षणिक
उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यामध्ये अंतराळाच्या संशोधनाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी
या उपक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा
जास्तीत जास्त सहभागी होतील, याची दक्षता घ्यावी.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS