⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर

पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर

पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर

आदिवासी  विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण

राज्यातील काही आदिवासी बहुल भागात कोलामी, माडिया, गोंडी, वारली यासारख्या   भाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जातो. तर या भागातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शैक्षणिक भाषेचा विरोधाभास तसेच मातृभाषेतील बालवाचन पुस्तकांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे  निर्माण  होतात. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक बोली भांषामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे. 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावं, यासाठी केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयच्या निर्देशानुसार  इयत्ता 1 ली ते 4 थीच्या मराठी बालभारती क्रमिक पाठयपुस्तकांचे महाराष्ट्रातील कोरकु, गोंडी, भिल, माथवाडी, मावची माडिया, कोलामी, भिल बसावे, भिल-भिलावू, वारली कोकणा/ कोकणी, पावरी व कातकरी या 12 बोलीभाषेत अनुवाद करण्यात येत आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात  ‘टीआरटीआय’ने  त्यांच्याकडे असलेल्या बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करून शासकीय आश्रमशाळासाठी  उपलब्ध केले. त्यामाध्यमातून आदिवासी बहुल भागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी व शिक्षकांना बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे नेले जाणार आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात पहिली व दुसरीचे अनुक्रमे 8682 व 8762 असे एकूण 17 हजार 444 पाठयपुस्तके उपलब्ध झाली आहे. या पुस्तकांचे वितरण आश्रमशाळा स्तरावर सुरू आहे. उर्वरित पाठयपुस्तके लवकरच प्राप्त होणार असून त्यांनतर त्यांचेही आश्रमशाळा स्तरावर वितरण केले जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

           राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण स्थानिक बोली भाषेत देण्याचा मानस आहे. जेणेकरून प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृध्दींगत होणे सुलभ होईल. बोलीभाषा ते प्रमाणभाषा असा विद्यार्थ्यांचा अध्ययन प्रवास असेल. त्यासाठी क्रमिक पुस्तकांचे 12 स्थानिक भाषांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या.


बोलीभाषानिहाय अनुवादित पाठयपुस्तकांची संख्या : कोरकु-1643, गोंडी-2653, भिल माथवाडी -3406, मावची-1576, माडिया-1320, कोलामी-210, भिलबसावे-1596, भिल- भिलावू-2209 वारली - 8244, कोकणा/कोकणी-6989, पावरी- 6493, कातकरी - 1046,  एकूण -  37385

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम