⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय

केंद्र शासनाने दिनांक ३१.०३.२०१० च्या अधिसूचनेव्दारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक २३ ऑगस्ट, २०१० च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरीता ( इ. १ ली ते इ. ८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ व शुद्धिपत्रक दिनांक ०६.०३.२०१३ द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरीता ( इ. १ ली ते इ.८ वी) शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे. यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्यात आली.

[प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता]

अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी करण्यात येत आहेत:-

१. शासन निर्णय दि.२०.०१.२०१६ मधील परिच्छेद क्र. ३ मधील "मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील" हा मजकूर वगळण्यात येत आहे.

[शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना शैक्षणिक अर्हता]

२. शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने, शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आला आहे, अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेले नाहीत, अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी.

[TET आता आयुष्यात फक्त एकदाच द्यावी लागणार , (NCTE) ने केली नियमांमध्ये सुधारणा]

३. ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधीन दि. ११.१०.२०२२ च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि, शासन निर्णयात असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे. परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही, अशा उमेदवारांना देखील ३ वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता/शालार्थ आयडी देण्यात यावा.

[राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी कुटुंबियांना (TET) शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत]

४. तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ही अर्हता धारण करु शकणार नाहीत, अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि, अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देणेबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता, सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील.

संदर्भ- शासन निर्णय संकेताक २०२४०९०२१८३७०८०३२१

[केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स]

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम