Maharashtra Teacher Eligibility Test - Syllabus / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
Maharashtra Teacher Eligibility Test / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२ या परीक्षेसाठी खालील
गटाप्रमाणे
भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-1 | मराठी | इंग्रजी | उर्दू | बंगाली / गुजराती / तेलुगू सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-2 | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील
पाठ्यक्रम राहील
(३) बालमानसशास्त्र व
अध्यापनशास्त्र:-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे
प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्ष बयोगटाच्या
विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा
असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये
यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन
पध्दती. मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका
अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.
४) गणित :-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील
मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या
निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी
च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.
५) परिसर अभ्यास :-
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे
इतिहास,
नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य
विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे
अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी
च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण
अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय
नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने
समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील
इतिहास,
नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य
विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता
१ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक
शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :
- · प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
- · प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
- · संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके
पेपर (२) (इ. ६ वी ते ८ वी - उच्च प्राथमिक
स्तर)
भाषा-1 | मराठी | इंग्रजी | उर्दू | बंगाली / गुजराती / तेलुगू सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-2 | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण
अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे
प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश
राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन
पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका
अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या
अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू
राहील.
४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून
त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न
हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील
संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.
४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-
सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न
असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय
व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी
ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या
इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-
- · प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
- · प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
- · प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
- · प्रचलित बी एड अभ्यासक्रम व पाठयक्रम
MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक
१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
↪️Book बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
2.मराठी भाषा(30 गुण)
↪️Book/Notes - के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे
3.इंग्रजी व्याकरण(30
गुण)
↪️Books/Notes - के सागर/बाळासाहेब शिंदे
4.गणित (30 गुण)
↪️ Book's/Notes - के सागर/ सचिन ढवळे/ सतीश वसे/नितीन महाले/ पंढरीनाथ राणे
5.परिसर अभ्यास (30
गुण)
↪️ Books/Notes- यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत
TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका
महत्त्वाचा संदर्भ
👉TET प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ
↪️ Book's- TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (परीक्षभिमुख, मुद्देशीर अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत उपयुक्त संदर्भ)
MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक
१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
↪️ Books- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र-
डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे- (परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
2.मराठी भाषा(30 गुण)
↪️ Books/Notes- के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
3.इंग्रजी व्याकरण(30
गुण)
↪️ Books/Notes- के सागर/बाळासाहेब शिंदे
IMP पेपर दोन देतांना
ज्यांची
पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार
विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे.
समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.
4.गणित व विज्ञान (60
गुण)
↪️यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
↪️ Book's- के सागर/सचिन ढवळे/ सतीश वसे/नितीन महाले/ पंढरीनाथ राणे
4.2- विज्ञान (30 गुण)
↪️ Books- शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी पाठ्यपुस्तके
5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)
5.1- इतिहास (30 गुण)
↪️ Books- पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
5.2 - भूगोल.(30 गुण)
↪️ Books- इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS