⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महावाचन उत्सवचे प्रशस्तीपत्र अचूक (Mahavachana Utsav Certificate) - शालेय शिक्षण विभाग

महावाचन उत्सवचे प्रशस्तीपत्र अचूक (Mahavachana Utsav Certificate) - शालेय शिक्षण विभाग

महावाचन उत्सवचे प्रशस्तीपत्र अचूक - शालेय शिक्षण विभाग

Mahavachana Utsav Certificate- शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात महावाचन उत्सव २०२४ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागाच्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर हे प्रशस्तीपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलेले आणि विभागाने उपलब्ध करून दिलेले हे प्रशस्तीपत्र अचूक असल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे.

महावाचन उत्सव २०२४ मधील सहभागाबाबत मिळणाऱ्या  प्रशस्तीपत्रामध्ये चुका असल्याचे काही माध्यमांमधून दाखविण्यात येत आहे. हे प्रशस्तीपत्र खरे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

[महावाचन उपक्रमाची ऑनलाईन नोंदणी | Online registration of Mahavachan]

महावाचन उत्सव २०२४ मध्ये सहभागी होण्याऱ्या विद्यार्थ्यांची माहिती वेब ॲप्लीकेशनमध्ये भरल्यानंतर शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यानंतर ही माहिती शाळेच्या डॅश बोर्डवर दिसते. ही माहिती योग्य असल्यास डॅशबोर्ड वर जनरेट सर्टिफिकेट लिंकवर क्लिक केल्यानंतर यासाठी विकसित करण्यात आलेल्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर प्रशस्तीपत्र ऑनलाईन उपलब्ध होत असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

[महावाचन उत्सव 2024: वाचन संस्कृतीचा साजरा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास]

बनावट प्रशस्तीपत्रामध्ये उल्लेख असलेल्या शाळेला याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम