शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेणे
आधार अवैध असलेल्या विद्यार्थ्यी देखील संच मान्यतेसाठी
शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु
आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेणे
सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक
शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतात. मा.मंत्री महोदय यांच्या
समवेत दिनांक १९.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ३०.०९.२०२३
रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यापैकी आधार वैध असलेली विद्यार्थी
संख्या विचारात घेवून सन २०२३-२०२४ ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे.
[संचमान्यता शासन निर्णय | Sanchamanyta Govt GR]
तथापि, विद्यार्थाच्या नावातील तफावतीमुळे अथवा
अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्याकडे
आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२३ २०२४ च्या मंजुर
पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे
या प्रकारच्या विद्यार्थ्याच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत
संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित
उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून
यावावतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले
विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना
खालील बाबींची खात्री करावी. (प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र १ ते ३ सोबत जोडले आहे.)
१. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या
विद्यार्थ्याच्या बाबतीत अशा विद्यार्थ्याची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची
प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य
शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत यांची शहानिशा करुन असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या
संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.
२. ज्या विद्यार्थ्याची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे
अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व
सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे
आधार कार्ड तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संच मान्यतेत
ग्राहय धरण्यात यावेत.
[संचमान्यता 2024-25 महत्वाची परिपत्रके | Important circulars regarding Sanchmanyta]
३. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुंडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या
शाळेत शिकत आहे, याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करुन
योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करणे.
४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत
संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देवून अर्ज
केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेल
प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री
करावी.
५.ज्या शाळांची किमान ९० टक्के विद्यार्थी शाळांनी आधार
वैध केलेले आहेत. त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्याबाबतची त्यांच्या अडचणी
लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी.
६. आधार इनव्हॅलीड / अनप्रोसेसड / आधार क्रमांक नसलेले
विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेवून खात्री पटल्यानंतरच
त्यास संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावे.
[संचमान्यतेचे सुधारित निकष आणि नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे शाळांमधील संरचनात्मक बदल करणे]
७. सदर सुविधा दिनांक ०७.१०.२०२४ पर्यंत उपलब्ध राहील.
आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या
गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर सदर विद्यार्थ्याना संच मान्यतेसाठी विचारात
घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर
विद्यार्थ्याना विचारात घेवून संच मान्यता सन २०२३-२०२४ करण्यात येतील.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS