माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा
दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणे
[डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम: वाचन प्रेरणा दिन]
सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व
शासकीय / निमशासकीय संस्था / मंडळ, सार्वजनिक उपक्रम इत्यादी
कार्यालयांना माजी राष्ट्रपती स्वर्गवासी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५
ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याबाबत मराठी भाषा
विभागाने उपरोक्त परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. मराठी भाषेचा प्रचार.
प्रसार, विकास, जतन, संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण आहे. या दिनाचे औचित्य साधून
मराठीच्या प्रचार, प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित
करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. याअनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात
यावी.
[वाचन प्रेरणा दिन | Vachan Prearana din | 15 ऑक्टोबर]
वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचन संस्कृती वृध्दींगत
होण्यासाठी मराठी भाषा विषयक विविध कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद आयोजन करण्याबाबत नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील मंडळे,
महामंडळे, नगर पालिका, महानगरपालिका,
सर्व क्षेत्रिय कार्यालये, अन्य संस्था यांना
दरवर्षी मराठी भाषा विभागाकडून १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्य निर्गमित
करण्यात येणाऱ्या परिपत्रकाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करणे. नगर विकास
विभागाच्या अखत्यारीतील मंडळे, महामंडळे, नगर पालिका, महानगरपालिका, सर्व
क्षेत्रिय कार्यालये, अन्य संस्था यांना नगर विकास
विभागाच्या अखत्यारीतील सर्व संस्था विशेषतः नगर पालिका, महानगरपालिका
यांच्या हद्दीतील डिजिटल बोर्डवर मराठी भाषेच्या जतन, संवर्धन,
विकास, प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने आवश्यक
सूचना प्रसारीत करण्याच्या सूचना नगर विभागाने द्याव्यात.
उपरोक्त बाबी साध्य करण्यासाठी मराठी भाषा धोरणातील नगर
विकास विभागासाठी करण्यात आलेल्या शिफारसींची अंमलबजावणी सत्वरपणे करण्यात यावी.
तसेच याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांना त्वरीत कळविण्यात यावे हि विनंती. मराठी
भाषा विभाग, शासन परिपत्रक दिनांक १३.०९.२०२४ महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक
२०२४०९१३१९३९५७१२३३ असा आहे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS