⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पोस्टल बॅलेट / EDC बाबत महत्वाचे मुद्दे | Important points regarding Postal Ballot / EDC

पोस्टल बॅलेट / EDC बाबत महत्वाचे मुद्दे

पोस्टल बॅलेट / EDC बाबत महत्वाचे मुद्दे

यावेळी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांची माहिती भरलेला Prefilled छापील फॉर्म नं 12 / 12 अ ची प्रत मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्या निवडणूक प्रशिक्षणाला जातांना खालील महत्वाच्या गोष्टीचे पालन करा व काळजी घ्या.

1) फॉर्म नं 12.- 

पोस्टल बेलेट मागणी साठी आपणास मिळालेल्या फॉर्म नंबर 12 वरील आपली माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्यावी.

कारण काही ठिकाणी असेही निदर्शनास आले  आहे की त्यात नमूद कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या मूळ विधानसभा मतदारसंघाचे नाव त्याचा क्रमांक चुकलेला आहे.

[टपाली मतदान आणि निवडणूक]

2) फॉर्म 12 अ शक्यतो अश्या महिला कर्मचारी की ज्यांची इलेक्शन ड्युटी त्यांचं मतदान असलेल्या मतदारसंघात असेल केवळ त्यांनाच फॉर्म नं 12 अ मिळालेला आहे. त्यांना EDC मिळेल , ज्यात ते नियुक्त मतदान केंद्रावर EVM वर मतदान करू शकतील.. त्यांनी देखील आपली माहिती तपासून घ्यावी.. (मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांचे मतदान कार्यरत विधानसभा मतदारसंघा बाहेर असेल त्यांनी फॉर्म 12 च भरून द्यायचा आहे.)

3) छापील तपशील बरोबर आढळून आल्यास फॉर्म 12 /12अ वर सही करावी. 

तथापि विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्र किंवा अ.क्र. या तपशिलात चूक असल्यास छापलेली माहिती रद्द करणेसाठी सदर अंकाला / नावाला स्पष्ट round करून त्याच्यावर सुधारित माहिती पेनाने नमूद करावी.

फॉर्म वर प्रत्येक चुकलेल्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.

4) फॉर्म नंबर 12 किंवा 12 अ सोबत जोडवायचे कागदपत्रे:-

१) मतदान कार्ड ची Xerox

२) निवडणूक आदेशाची प्रत

वरील दोन्ही कागदगपत्र जोडणे बंधनकारक आहे, अन्यथा आपली पोस्टल बेलेट / EDC ची मागणी नाकारली जाईल.

5) निवडणूक आदेशात आणि फॉर्म 12 किंवा 12 अ वर mobile क्रमांक दिलेले आहेत, सदर क्रमांक प्रत्येकाने तपासावा, योग्य नसल्यास पहिला क्रमांक खोडून खरा Mobile क्रमांक अचूक नमूद करावा.

अश्या पद्धतीने तपासलेला डेटा अचुक असल्याची खात्री करून व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म 12 / 12 अ प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी हजेरीच्या टेबलवर जमा करावा.

6) मतदान पथकांच्या मानधन वाटपासाठी त्यांच्या बँक खात्याचा अचूक तपशील आवश्यक असल्याने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी प्रथम प्रशिक्षणास येताना बँक पासबुकच्या पहिल्या पानाची Xerox सोबत आणणे अनिवार्य आहे.

पहिल्या प्रशिक्षणास येताना आणायची आवश्यक कागदपत्रे

1.नमुना 12/ 12

2.निवडणूक आदेश

3.मतदार ओळखपत्र

4.बँक पासबुक पहिले पान

कृपया या सूचना प्रत्येक कर्मचारी यांचे पर्यंत पोहचवा.

चला 100% कर्मचाऱ्यांनी मतदान करूया, लोकशाही बळकट करूया.

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम