राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण 2024
राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण 2024
State Curriculum Framework – School Education 2024
राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० (NEP-2020 ) एक महत्त्वाकांक्षी धोरण दस्तऐवज आहे, ज्याचा
उद्देश देशातील सर्व विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक निष्पत्ती सुधारणे हा आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० चे उद्दिष्ट या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देणे आणि
३ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरांवर
शिक्षणासाठी स्पष्ट शिफारसी करणे हे आहे.
शालेय शिक्षण धोरणाचे ठळक मुद्दे
अ) ५+३+३+४ चा आकृतिबंध : ३ ते ८ वर्षे या वयोगटासाठी
पायाभूत स्तर, ८ ते ११ वर्षे या वयोगटासाठी पूर्वतयारी स्तर, ११ ते १४ वर्षे या वयोगटासाठी पूर्व माध्यमिक स्तर आणि १४ १८ वर्षे या
वयोगटासाठी माध्यमिक स्तर अशी रचना तयार केली आहे.
ब) बालपणातील शिक्षण (Early Childhood Care and Education (ECCE
) बालपणीच्या सर्व संबंधित विकासात्मक क्षेत्रांचा विचार करून समग्र
अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
क) मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाचण्याची आणि
लिहिण्याची क्षमता आणि संख्यांसह मूलभूत कार्ये विकसित करण्याची क्षमता याकडे
भविष्यातील सर्व शालेय शिक्षण आणि आजीवन शिक्षणासाठी आवश्यक पाया आणि अपरिहार्य
पूर्वतयारी म्हणून पाहिले जाते.
ड) अभ्यासक्रमाची उद्दिष्टे चिकित्सक विचार, निर्णय क्षमता आणि सर्जनशीलता, नैतिक, मानवी आणि घटनात्मक मूल्ये यांसारख्या क्षमता आणि मूल्यांच्या निरस वाटणाऱ्या शिक्षणाऐवजी वैचारिक आकलनावर भर दयावा.
इ) बहुविद्याशाखीय, सर्वांगीण आणि एकात्मिक
शिक्षण सर्व ज्ञानाची एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी बहुविदयाशाखीय विज्ञान,
सामाजिकशास्त्रे, कला, मानव्यविदया,
क्रीडा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे.
ग) अभ्यासक्रमातील माहितीचे ओझे कमी.
ह) माध्यमिक स्तरात विषय निवडीचे स्वातंत्र्य माध्यमिक
शाळांमध्ये शारीरिक शिक्षण आणि निरामयता, कला शिक्षण आणि व्यावसायिक
कौशल्यांसह अभ्यासाच्या विषयांची लवचिकता आणि निवड संधीची शिफारस करते. जेणेकरून,
विद्यार्थी अभ्यासाचे स्वतःचे मार्ग आणि भविष्याविषयी योजना तयार
करू शकतील.
व्यावसायिक शिक्षण
- बहुभाषिकता भारताचा बहुभाषिक वारसा आणि अनेक भाषा
शिकण्याचे फायदे लक्षात घेता, हे धोरण भारतातील मूळ भाषांसह अनेक
देशी व विदेशी भाषा शिकण्यावर भर देते.
- भारतातील रुजलेल्या मूळ परपंरा केवळ विचारातच नव्हे, तर
भावनेने, बुद्धीने आणि कृतीतही
- भारतीय असल्याचा अभिमान विदयार्थ्यांमध्ये निर्माण करणे, तसेच
मानवी हक्क, शाश्वत विकास आणि जागतिक कल्याणासाठी जबाबदार
बांधिलकीचे समर्थन करणारे ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि स्वभाववृत्ती विकसित करून खऱ्या अर्थाने जागतिक नागरिकत्व
प्रतिबिंबित करणे हे या धोरणाचे ध्येय आहे.
- अशा प्रकारे या उद्दिष्टांना अनुसरून राष्ट्रीय शिक्षण धोरण
- २०२० द्वारे सुरू केलेला परिवर्तनकारी प्रवास सुरू ठेवणे अभिप्रेत आहे. हा भाग
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (SCF-SE) सारांश आहे. यामध्ये
राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या निर्मितीसाठी अवलंबलेल्या मूलभूत तत्त्वांची
रूपरेषा आणि नंतर मुख्य प्रकरणांचा सारांश दिला आहे.
काही प्राथमिक मुद्दे
हा राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF-SE) एकात्म,
सुसंघटित, संस्थात्मक अनुभव देणारा आहे.
अभ्यासक्रम अभ्यासक्रम म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टांसाठी कोणत्याही संस्थात्मक
माध्यमातून साधलेला विदयार्थ्यांचा संघटित अनुभव होय.
अभ्यासक्रम तयार करणारे आणि त्याचे दैनंदिन जीवनात उपयोजन
करणारे असंख्य घटक आहेत. यामध्ये ध्येये आणि उद्दिष्टे, अभ्यासक्रमात
शिकविला जाणारा आणि शिकला जाणारा आशय (सामग्री), शैक्षणिक
पद्धती आणि मूल्यांकन, अध्यापन अध्ययन साहित्य (दृक्श्राव्य
शैक्षणिक साधने), शाळा आणि वर्ग पद्धती, शिक्षणाचे वातावरण, संस्थेची संस्कृती इत्यादी
समाविष्ट आहे.
अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमाच्या विकासासाठी मार्गदर्शक
तत्त्वे उद्दिष्टे, रचना आणि घटक प्रदान करणे आवश्यक आहे,
ज्याद्वारे राज्य मंडळे आणि शाळांमधील शिक्षकांसह संबंधित
पदाधिकाऱ्यांद्वारे अभ्यासक्रम, दृकश्राव्य शैक्षणिक साधने,
उपक्रमांसाठी साहित्य, स्वाध्याय पुस्तिका,
पाठ्यपुस्तके आणि मूल्यांकन पद्धती विकसित करणे या संदर्भात
अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शिफारशी केल्या जातात.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट शिक्षणशास्त्रासह
अभ्यासक्रमात सकारात्मक बदल करून राज्यातील शालेय शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल
घडवून आणण्यास मदत करणे हा या राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५+३+४ आकृतीबंधातील
शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक
शिक्षण व प्रौढ शिक्षण मधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची
गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय दि. २४/०५/२०२३ अन्वये
मा. मंत्री शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन
करण्यात आलेली आहे (३२ सदस्य) आणि शासन निर्णय दि.०२/०१/२०२४ अन्वये सदर
समितीमध्ये ०३ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा PDF - शालेय शिक्षण 2024
माहिती | PDF लिंक |
---|---|
राज्यस्तरीय सुकाणू समिती इतिवृत्त (09.09.2024) SCF-SE मान्य | डाऊनलोड |
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 (SCF-SE सुकाणू समिती साठीची प्रत) | डाऊनलोड |
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url