स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon उपक्रम: ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी संधी,स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ ते ८ वी च्या
स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon उपक्रम: ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी
संधी
स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात
इयत्ता ६ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित पोर्टल
सुरु
STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या
उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील
कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या
उपक्रमांतर्गत NEP २०२०, NCF २०२३,
UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत (Themes ) विद्यार्थ्यांनी
प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत
जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील
समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे.
तसेच सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व हॅकेथोन
उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर दिनांक २५ व २६
सप्टेबर २०२४ या कालावधीत तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे. या
उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील
अधिव्याख्याता / वरिष्ठ अधिव्याख्याता नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
सदर उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी सहभागी
होण्यासाठी या उपक्रमातील विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी
व्हायचे आहे. यासाठी प्रस्तुत परिषदेमार्फत https://maa.ac.in/SCERTMahaHackathon नोंदणी लिंक देण्यात येत आहे. सदर लिंक परिषदेच्या साईट वर अपलोड करण्यात
आली आहे. सदर लिंक ही दिनांक १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी खुली
राहील . सदर नोंदणी शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना
लिंकवर देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान १००० नोंदणी होणे
अपेक्षित आहे. यास्तव आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता ६ ते ८ या सर्व
विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे सदर
उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क
करावा.
Hackathon Registration
हॅकॅथॉन- २०२४-२५ FAQ
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे हॅकॅथॉन- २०२४-२५
- [accordion]
- हॅकॅथॉनमधे सहभागी होण्यास प्रतिकृती तयार करण्यासाठी
विषय (themes)
कोणते आहेत?
- आरोग्य
- कृषी
- वाहतूक व दळण वळण
- दर्जेदार शिक्षण
- पर्यावरणपूरक जीवन शैली
- नागरी विकास रचना
- पर्यटन
- संगणनीय विचार
- स्वच्छता
- अन्न आणि पोषण
- परवडणारी व स्वच्छ उर्जा
- लिंग समभाव
- सांस्कृतिक वारसा
- प्रदूषण
- डिजिटल सुरक्षा
- हॅकॅथॉनमधे कोणत्या इयत्तेतील विदयार्थी सहभागी होऊ शकतात?
- इयत्ता ६ ते ८ मधील विदयार्थी
- विद्यार्थ्यांना वैयक्तिक सहभागी होता येईल की गटात ?
- गटात
- एका गटात किती विदयार्थी सहभागी होऊ शकतात?
- २ विदयार्थी
- एका शाळेतून किती प्रतिकृती सादर करता येतील?
- जास्तीत जास्त ३
- हॅकॅथॉनमधे कोणत्या व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होऊ
शकतात?
- १. स्थानिक स्वराज्य संस्था
- २. शासकीय
- ३. शासकीय अनुदानित
- हॅकॅथॉनसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी कोणी करायची?
- शिक्षकांनी
- नोंदणी करण्यासाठी कोणती लिंक आहे?
हॅकॅथोन (Hackathon) म्हणजे काय ?
१ हा एक काल मर्यादित उपक्रम आहे
२ यात व्यक्ती किंवा संघ नविन उपाय, उत्पादने
किंवा सेवा तयार करण्यासाठी एकत्रित कार्य करतात
हॅकॅथोन (Hackathon) समावेश
- समस्या सोडविणे
- प्रोटो टायपिंग (Preliminary version product to test
functions,use)
- कोडींग (computer programming )
- डिझाईन तयार करणे (creating ideas, concepts, solution to
solve problem)
- नाविन्य पूर्ण उपक्रम (Innovation )
हॅकॅथोन (Hackathon) वैशिष्ट्ये
- काल मर्यादित
- सहयोगी वातावरणात आयोजन
- बहुविद्याशाखीय दृष्टीकोन
- सातत्याने मार्गदर्शन
- स्पर्धा
हॅकॅथोन (Hackathon) Process /टप्पे
- समावेशित विषयाबद्दल माहिती ( Theme
announcement )
- नोंदणी व संघ तयार करणे ( Registration and team formation)
- कल्पना तयार करणे व कार्यान्वयित करणे (Idea generation
and pitching )
- मार्गदर्शन व कार्यशाळा (Mentoring and workshops )
- मूल्यमापन ( Pitching and Judging)
- स्पर्धा व ओळख निर्मिती ( Awards and recognition )
हॅकॅथोन उपक्रमाची उद्दिष्टे
- हॅकेथॉन हा इयत्ता ६ वी ते ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी कृतियुक्त उपक्रमातून उद्योजकतेसाठी प्रेरणा देणारा नवोपक्रम आहे
- वास्तविक-जगातील समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधणे व तो अंमलात आणणे याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाणार आहे .
- या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्ये रुजवून नवनिर्मितीची मानसिकता तयार करणे.
- स्थानिक आणि जागतिक समस्या ओळखणे, त्यावर
उपाय तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे. विद्यार्थ्यांमध्ये
कौशल्ये, ज्ञान आणि मूल्य निर्मिती करणे.
- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय
अभ्यासक्रम आराखडा २०२३, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल
डेव्हलपमेंट गोल्स (UN प्रतिकृती SDGS), यामध्ये नमूद केलेल्या महत्वाच्या विषयान्वये निवडण्यात आलेल्या १५ themes
/ विषयांवर विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे.
हॅकॅथोन (Hackathon) विषय / Themes
१. आरोग्य
२. कृषी
३. वाहतूक व दळणवळण
4. दर्जेदार शिक्षण
५. पर्यावरणपूरक जीवन शैली
६. नागरी विकास रचना
७. पर्यटन
८. संगणनीय विचार
९. स्वच्छता
१०.अन्न आणि पोषण
११. परवडणारी व स्वच्छ उर्जा
१२. लिंग समभाव
१३. सांस्कृतिक वारसा
१४. प्रदूषण
१५. डीजीटल सुरक्षा
कोण भाग घेऊ शकतो ?
- इयत्ता ६ वी ते ८ वीचे विद्यार्थी
- शाळा - शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था,
शासकीय अनुदानित
- २ विद्यार्थ्यांचा गट व मार्गदर्शक शिक्षक
प्रत्येक जिल्ह्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
- · प्रति जिल्हा किमान १०००-२००० कल्पना सबमिट करायच्या आहेत
- · जिल्हास्तरीय प्रदर्शनीत १०० - १५० कल्पना प्रदर्शित केल्या जातील
- · राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी प्रथम ३ आयडिया निवडल्या जातील
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS