⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक | In-Service B.Ed.Course 2024-26 Admission Time Table

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक | In-Service B.Ed.Course 2024-26 Admission Time Table

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक | In-Service B.Ed.Course 2024-26 Admission Time Table

यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-26 या तुकडीसाठी (In-Service B.Ed.Course) सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 18 ऑक्टोबर, 2024 पासून सुरू होत आहेत. 

ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक- दि. 18/10/2024
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक- दि. 22/10/2024 (रात्री 11.59 वा. पर्यंत)
  • अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत - दि. 23/10/2024

शिक्षणक्रमासंबंधी माहिती

देशभरातील पारंपरिक विद्यापीठांमधून दोन वर्षे कालावधीचा नियमित बी.एड. शिक्षणक्रम सुरू आहे. नियमित बी. एड. शिक्षणक्रम सेवांतर्गत शिक्षकांना करता येणे शक्य नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने (In-Service B.Ed.Course) सेवांतर्गत शिक्षकांसाठी नोकरी करताना पूर्ण करता येईल असा २ वर्षे कालावधीचा 'सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम' (बी.एड.) १९९१ पासून सुरू केला.

(२.१) कालावधी या शिक्षणक्रमाचा किमान कालावधी २ वर्षांचा व कमाल कालावधी ५ वर्षांचा आहे. कमाल पाच वर्षांच्या कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण न केल्यास अध्ययनार्थीस कमाल कालावधी संपल्याच्या दिवसापासून, पुन्हा पाच वर्षांसाठी त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करता येईल.

(२.२) एकूण श्रेयांक - हा शिक्षणक्रम ८० श्रेयांकांचा म्हणजे सुमारे २४०० अध्ययन तासांचा आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास होय.)

(२३) शिक्षणक्रम माध्यम - बी.एड. शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी आहे. या शिक्षणक्रमाचे स्वयं अध्ययन साहित्य मराठीत आहे.

भाग- I - बी.एड. प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना

महत्त्वपूर्ण सूचना

१) अर्जदाराने या शिक्षणक्रमाची प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईटवरून घ्यावी. माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे या शिक्षणक्रमासाठी असलेल्या प्रवेश लिंक वरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री अर्जदाराने करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात नंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. प्रवेश अर्जात भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच 'Submit बटण दाबावे.

२) प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर तीन दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (स्वयं संपादन) अर्जदाराला देण्यात येईल. या मुदतीतच अर्जदाराने प्रवेश अर्जात आवश्यक ती दुरुस्ती करावी.

३) २०२४- २६ बी. एड. तुकडीचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी सेवा अनुभव दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत नोंदविता येईल. या तारखेनंतरचा सेवा अनुभव यावर्षीच्या प्रवेशासाठी विचारात घेतला जाणार नाहीत.

४) ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीवेळी आपणाकडे असणे अनिवार्य असेल. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.

५) बी एड. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

६ ) ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहिती आधारे खुला व आरक्षित वर्गाची केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित अर्जदाराने विभागीय केंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी. विभागीय केंद्राने अर्जदाराच्या प्रवेश अर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर केंद्रनिहाय प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर विद्यापीठ व अभ्यासकेंद्र शुल्क भरून अर्जदाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा. आपल्या प्रवेशासंदर्भातील माहिती / कागदपत्रे चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाल्यास विद्यापीठ समिती मार्फत आपल्या प्रवेशाची चौकशी करण्यात येईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास आपला प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश रद्द करताना आपण भरलेले प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही. तसेच आपल्यावर खोटी माहिती पुरविल्यासंदर्भात FIR दाखल केला जाईल. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. ज्या अर्जदारांना आरक्षणाअंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. अशा अर्जदारांनी शासन निर्णयानुसार आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे तसेच नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र विभागीय केंद्र प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

७) विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर प्रवेशअर्ज आपोआप लॉक होईल. त्यामुळे पडताळणी नंतर कोणत्याही बदलासंदर्भातील पत्रव्यवहार विद्यापीठाला करू नये.

८) अर्जदारांनी आपल्या शाळेच्या जिल्ह्यातूनच प्रवेश अर्ज भरावा अन्यथा प्रवेशप्रक्रियेतून तो बाद होईल. जिल्हानिहाय अभ्यासकेंद्राची यादी असणारा तक्ता या माहितीपुस्तिकेत बी. एड. शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र या मुद्याअंतर्गत देण्यात आलेली आहे. उदा.

मुंबई उपनगर (सब अर्बन) साठी चेंबूर सर्वकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चेंबूर हे केंद्र असेल. यात बोरिवली (URC-1), कांदिवली (URC-2), गोरेगाव (URC-3), अंधेरी (URC-4), सांताक्रूझ (URC-5), भांडूप (URC-6), घाटकोपर (URC-7), चेंबूर (URC-8), कुर्ला (URC-9). घाटकोपर (DYD_URC3), अंधेरी (DYD_URCS), मालाड W (DYD_URC6), कांदिवली E (DYD_URC7), हे भाग असतील,

मुंबई शहरासाठी एस.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय धोबीतलाव हे अभ्यासकेंद्र असेल. बात परेल (URC- 10), दादर (URC-11), भायखळा (URC-12), अँटरोड (DYD_URCI), सायन (DYD_URC2), मुलूड (DYD_URC4) हे भाग असतील.

ठाणे जिल्ह्यासाठी सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर असेल.

पालघर जिल्ह्यासाठी ए. जी. एस. कॉलेज ऑफ एज्युकेशन बोईसर, जि. पालघर असेल.

रायगड जिल्ह्यासाठी रायगड जिल्ह्यातील शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय असेल,

९) प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र अभ्यासकेंद्र आहे. प्रवेशार्थीने आपल्या शाळेच्या जिल्ह्याचाच अभ्यासकेंद्र म्हणून विचार करणे अनिवार्य आहे.

१०) एखाद्या जिल्ह्याच्या जागा प्रवेश अर्जाअभावी रिक्त राहिल्यास त्या विद्यापीठाच्या विभागातील उर्वरित जिल्ह्यांच्या संबंधित प्रवर्गातील सर्व अर्जदारांचा एकत्रित गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातील उर्वरित जागा नव्याने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील अर्जदारांच्या जिल्ह्यातच अतिरिक्त जागा म्हणून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. हे करताना त्या जिल्ह्यातील जागा ५० पेक्षा जास्त होणार नाही, याची खात्री करण्यात येईल.

११) दिव्यांगासाठी ५% म्हणजे एकूण ७५ जागा भरण्यात येतील. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दोन तीन जागा दिव्यांग विद्यार्थी प्रवेश कार्यपद्धतीनुसार गुणवत्ता यादीचा विचार करून भरण्यात येतील. ज्या जिल्ह्यात दिव्यांगांचे अर्ज जास्त असतील त्यातील पाच जिल्ह्यांना दिव्यागांच्या तीन जागा देण्यात येतील.

१२) प्रवेशासंदर्भातील सर्व सूचना http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील. अर्जदाराने त्या पाहून त्यानुसार कृती करणे अर्जदारांनी जबाबदारी असेल.

१३) प्रवेशांनंतर विद्यापीठाकडून बी. एड. शिक्षणक्रम संरचना, अभ्यासविषयक साहित्य किंवा अभ्यासकेंद्रात कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात आला तर तो अर्जदाराला बंधनकारक असेल.

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2024-26 नोंदणी लिंक

[ONLINE REGISTRATION FOR YCMOU B.Ed. PROGRAMME 2024-2026]

शिक्षणक्रम प्रवेश पात्रता

सेवांतर्गत बी.एड. किमान पात्रता

  1. यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी.
  2. पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना किमान ५० % (४९.५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण) व मागासवर्गीय अर्जदारांना किमान ४५ % (४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण) गुण असणे अनिवार्य आहे. (महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी Scale लागू केली आहे अशा अर्जदारांना पदवी / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही, मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)
  3. डी.एड./डी.टी.एड./ हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ / अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्षे) अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.
  4. प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल. पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल, असे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

सेवांतर्गत बी.एड. प्रवेश अपात्रता

  1. पुढील प्रकारचे अर्ज अपात्र ठरतात. तशी आवेदनपत्रे प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व अर्जदारास याबाबत कळविले जाणार नाही.
  2. ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही.
  3. सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे
  4. अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज
  5. सध्या सेवेत नसलेले शिक्षक
  6. तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक.
  7. यु.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक.
  8. पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेले, परंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.
  9. बालवाडीत शिकविणारे शिक्षक
ONLINE REGISTRATION FOR YCMOU B.Ed. PROGRAMME 2024-2026

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम