राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ | State Level Innovation Competition 2024-25
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ |
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा ही प्रत्येक वर्षी शिक्षक आणि
शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला व नवोन्मेषी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी
आयोजित केली जाते. सन २०२४-२५ साठी देखील ही स्पर्धा पुढील पाच गटांमध्ये विभागली
गेली आहे,
ज्यामध्ये अंगणवाडी सेविका ते वरिष्ठ अधिव्याख्याते यांचा समावेश
आहे. या लेखात आपण या स्पर्धेची सविस्तर माहिती घेणार आहोत.
स्पर्धेचे उद्दिष्ट
राज्यातील सर्व शिक्षक आणि अधिकारी हे गुणवत्तापूर्ण शिक्षण
देण्याचा उद्देश ठेवून विविध नवोपक्रम हाती घेत असतात. या स्पर्धेद्वारे शिक्षक, अंगणवाडी
सेविका, तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना त्यांच्या
नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी नवीन
कल्पनांची आणि उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
२०२४-२५ ही अशा नवकल्पनांना मान्यता मिळवून देणारी महत्त्वाची स्पर्धा आहे.
स्पर्धेतील गट
सन २०२४-२५ साठी आयोजित केलेली राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
पाच वेगवेगळ्या गटांमध्ये घेतली जाणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धक आपल्या
नवोपक्रमाचे सादरीकरण करू शकतील.
१.
पूर्व प्राथमिक गट
यामध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांचा समावेश
होतो. हे गट शैक्षणिक आणि बालविकासाशी संबंधित उपक्रमांसाठी महत्त्वाचे आहेत.
बालकांच्या प्राथमिक शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध नवीन कल्पना
मांडल्या जातात.
२.
प्राथमिक गट
या गटात उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम सुरू करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी हा
गट महत्त्वाचा ठरतो.
३.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट
या गटात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक
यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यात
सृजनशीलता जागवण्यासाठी या गटातील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे.
४.
विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, विशेष
शिक्षक, ग्रंथपाल गट
या गटात शैक्षणिक साधनं आणि विशेष गरजांच्या
विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम तयार करण्यासाठी सहायक शिक्षकांचा समावेश होतो.
५.
अध्यापकाचार्य आणि पर्यवेक्षकीय अधिकारी गट
या गटात अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते
शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याते यांचा समावेश होतो.
शैक्षणिक प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी या गटातील अधिकारी नवोपक्रम सादर करू
शकतात.
स्पर्धेची प्राथमिकता आणि आयोजन
स्पर्धेचा पहिला टप्पा गट १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर, आणि
गट ४ आणि ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या स्तरावर आयोजित केला जाईल.
प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास विभाग,
तसेच जिल्हा परिषद या स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक समन्वय साधणार
आहेत. स्पर्धेतील सहभागींच्या संख्येत वाढ होण्यासाठी विविध माध्यमांद्वारे (जसे
की व्हॉट्सअॅप, वर्तमानपत्रे) व्यापक प्रसिद्धी दिली जाणार
आहे.
नोडल अधिकारी नेमणूक
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्था (डाएट) कडून एका सक्षम अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली जाईल.
या अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक, आणि
स्पर्धेबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल researchdept@maa.ac.in या ई-मेल पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील सहभाग
सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि अधिकारी यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन
दिले जात आहे. स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रमाचे अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेत
सादर करावेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक लिंक दिली जाणार आहे, ज्या लिंकवर नवोपक्रम सादर करण्यास सूचित केले जाईल.
नवोपक्रमाची सादरीकरण प्रक्रिया
स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रमाच्या अहवालाची तयारी अत्यंत
काळजीपूर्वक करावी. प्रत्येक नवकल्पना ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सकारात्मक
बदल घडविणारी असावी. सादरीकरण करताना कल्पनेचा मूळ हेतू, ती
कशी अंमलात आणली जाईल, त्याचे फायदे आणि विद्यार्थ्यांवरील
परिणाम यांचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे. प्रत्येक उपक्रमाचे शैक्षणिक मूल्य
सिद्ध करण्यासाठी आकडेवारी आणि प्रत्यक्ष उदाहरणांचा वापर करणे अत्यंत उपयुक्त
ठरते.
स्पर्धेचे महत्त्व
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा ही शिक्षक आणि शैक्षणिक
अधिकाऱ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारी मंच आहे. या स्पर्धेमुळे नवीन शैक्षणिक
कल्पना समोर येतात, ज्या शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवू
शकतात. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी नवोपक्रमाचा
महत्त्वाचा वाटा आहे. नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ ही सृजनशीलता, नवकल्पना आणि शैक्षणिक सुधारणा यांना एकत्र आणणारी महत्त्वपूर्ण संधी आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा ही शिक्षक आणि शैक्षणिक
अधिकाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, शिक्षणपद्धतीत
सुधारणा घडविण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होऊ
शकतो. सर्व संबंधितांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप
देण्याचा प्रयत्न करावा.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ माहितीपत्रक
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या
शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. याच बरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व
अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच
कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी
प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील
शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी
यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी
१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व
पर्यवेक्षिका)
२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व
मुख्याध्यापक)
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक,
उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५.अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व
वरिष्ठ अधिव्याख्याता) सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या
स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :
१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन
अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.
२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता
आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.
३. शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह,
तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध पूर्व प्राथमिक
ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या
दृष्टीने घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.
४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय
अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे, ५.
शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर
शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.
नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे
नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.१) नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.
२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.
३) नवोपक्रमाची उद्दिष्टे हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.
४) नवोपक्रमाचे नियोजन -
१) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
२) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा
३) आवश्यक साधनांचा विचार
४) करावयाच्या कृतींचा क्रम
५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
६) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)
७) उपक्रमासाठी इतरांची मदत
८) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
५) नवोक्रमाची कार्यपद्धती -
1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
11. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन
III. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
IV. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी
v. माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक
वाटल्यास)
६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)
[राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मधील नवोपक्रम अहवाल]
या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या
घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी.
उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा
वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी, त्याचप्रमाणे
आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.
७) समारोप आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा
झाला,
हे स्पष्ट करावे.
८) संदर्भसूची व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या
संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील
विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते
परिशिष्टामध्ये जोडावे.
१९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7BjMmcx IHe या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. (लिंक वरील माहिती फक्त अहवाल लेखन मार्गदर्शनार्थ देण्यात आली आहे.)
स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी
१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका,
महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते
१२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८वी ला शिकवणारे
शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील, २. राज्यातील ICDS
विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका
या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.
३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व
शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार
अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी,
शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या
प्राधिकरण (RAA)/ DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.
५. सन २०२३ २४-पासून मराठी माध्यमासह इतर शिक्षक व अधिकारी
यांचेसाठी देखील सदर स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी
आपला नवोपक्रम अहवाल मराठी, किंवा इंग्रजी भाषेमध्ये च सादर करावा.
[राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ मधील नवोपक्रम अहवाल]
स्पर्धेचे नियम
नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :
१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.
२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय
नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र
सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)
३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा, याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात
प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या
क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही
विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.
५. नवोपक्रम लेखन मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत
लिहिलेला असावा.
६. नवोपक्रम टाईप केलेला असावा, टाईपिंग
साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२,
पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू, वरील
बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास
असावा,
७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी
ग्राह्य धरला जाणार नाही. ८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२३-२४ किंवा
२०२४-२५ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.
९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी, फाईलमध्ये
नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.
१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये
१०० शब्द मर्यादित नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.
११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने
स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF
व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.
१२. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त
होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या
लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.
१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ साठी स्पर्धकांनी आपले
नवोपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.
१४. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व
राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण
करणे बंधनकारक असेल. १५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व
उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन
विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.
नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ संभाव्य वेळापत्रक
अ.क्र. | तपशील | कालावधी/दिनांक स्वरूप |
---|---|---|
1 | जिल्हा समन्वयक यांची मार्गदर्शन बैठक | दि.०४/११/२०२४ ऑनलाईन |
2 | नवोपक्रम नोंदणी | दि.०४/११/२०२४ ते दि.२०/११/२०२४ स्पर्धकांनी ऑनलाईन पोर्टलवर |
3 | छाननी (पात्र/अपात्र) | दि.२१/११/२०२४ ते दि.२७/११/२०२४ऑनलाईन |
मूल्यांकन वेळापत्रक
अ.क्र. | तपशील | कालावधी/दिनांक स्वरूप | आयोजक |
---|---|---|---|
1(टप्पा क्र.) | अ) जिल्हास्तर – गट १ ते ३ पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण | दि.०९/१२/२०२४ ते दि.२०/१२/२०२४ ऑनलाईन | जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई |
2 | दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण | दि.१३/१२/२०२४ ते दि.३१/१२/२०२४ ऑफलाईन | जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई |
3 | विभागस्तर - गट ४ ते ५ पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण | दि.१६/१२/२०२४ ते २७/१२/२०२४ ऑनलाईन | प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व) |
4 | दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण | दि.०१/०१/२०२५ ते दि.०९/०१/२०२५ ऑफलाईन | प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई |
5 (टप्पा क्र.२) | राज्यस्तर गट १ ते ५ पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण | दि.१५/०१/२०२५ ते ३१/०१/२०२५ ऑनलाईन | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे |
6 | दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण | दि.०७/०२/२०२५ दि.०३/०२/२०२५ ते ऑफलाईन | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे |
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS