RTE 25% % admission, RTE admission,आरटीई 25% टक्के,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ app
आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE 25% admission) प्रक्रिया २०२५-२६: संपूर्ण माहिती
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९
अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी (RTE 25%
admission) आरटीई २५ टक्के प्रवेश
प्रक्रिया महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील
बालकांना खाजगी स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा,
पोलीस कल्याणकारी शाळा, आणि महानगरपालिका
शाळांमध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गाच्या २५ टक्के जागांवर प्रवेश
दिला जाणार आहे.
प्रवेश प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
पालकांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरायचे असून, ही
सुविधा १४ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत उपलब्ध आहे. पालकांनी
वेळेत अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना
1. अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ
https://student.maharashtra.gov.in/adm_portal या
संकेतस्थळावर पालकांनी नोंदणी करावी व अर्ज सादर करावा.
2. वंचित घटकातील बालकांचा समावेश:
- अनुसूचित जाती (SC)
- अनुसूचित जमाती
(ST)
- विमुक्त जाती (VJNT)
- भटक्या जमाती (NT)
- इतर मागासवर्ग (OBC)
- आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटक (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी)
- दिव्यांग
बालक
- अनाथ बालक
- एच.आय.व्ही.
बाधित किंवा प्रभावित बालक
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती
3. शाळांची निवड आणि अंतर मोजणी
पालकांनी निवडलेल्या १० शाळांपैकी कोणतीही शाळा निवडताना
घरापासून शाळेपर्यंतचे अंतर गूगल मॅपद्वारे तपासावे. हे लोकेशन फक्त पाच वेळा
बदलता येईल, याची नोंद घ्यावी.
4. एकच अर्ज सादर करा
एका विद्यार्थ्यासाठी फक्त एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा.
एकापेक्षा अधिक अर्ज आढळल्यास अर्ज लॉटरी प्रक्रियेत विचारात घेतला जाणार
नाही.
RTE 25% admission प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रे अनिवार्य
आहेत:
1. निवासी पुरावा:
- रेशनिंग कार्ड, वीज
बिल, घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स
- भाडेकरारनामा
(नोंदणीकृत व ११ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा)
2. जन्मतारखेचा
पुरावा:
- ग्रामपंचायत, महानगरपालिका
किंवा रुग्णालयाचा दाखला
- अंगणवाडी
रजिस्टरमधील माहिती
3. जातीचा दाखला:
- तहसीलदार, उपजिल्हाधिकारी
किंवा उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी दिलेला प्रमाणपत्र
4. आर्थिक दुर्बल
घटकासाठी उत्पन्नाचा दाखला:
- तहसीलदारांचा
दाखला किंवा पगाराचा स्लिप
5. दिव्यांग
मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र:
- जिल्हा
शल्यचिकित्सकांनी दिलेले प्रमाणपत्र (४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व)
6. इतर विशेष
घटकांसाठी:
- एचआयव्ही बाधित
मुलांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र
- घटस्फोटित किंवा
विधवा पालकांसाठी न्यायालयीन दस्तऐवज
महत्त्वाचे
मुद्दे
- पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी.
- अर्ज सादर करताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करु नयेत.
- तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करण्यात विलंब होण्याची
शक्यता टाळण्यासाठी अर्ज वेळेत सादर करावा.
- आधारकार्ड नसेल, तर तात्पुरता प्रवेश दिला
जाईल. मात्र, प्रवेशानंतर ९० दिवसांच्या आत आधारकार्ड सादर
करणे बंधनकारक आहे.
मदत केंद्र संपर्क
प्रवेश प्रक्रियेबाबत अडचणी असल्यास (RTE 25% admission) आरटीई पोर्टलवरील
मदत केंद्राशी संपर्क साधा.
आरटीई प्रवेश प्रक्रिया (RTE 25% admission) ही वंचित व
दुर्बल घटकांतील बालकांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने
उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. योग्य माहिती व कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करा
आणि या संधीचा लाभ घ्या.
आरटीई कायद्याचे महत्त्व आणि उद्दिष्ट
आरटीई
म्हणजेच Right to Education Act अंतर्गत शाळांमध्ये (RTE 25% admission) २५% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय
विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हा उपक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणाला
प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रदान करण्यासाठी आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश (RTE 25% admission) प्रक्रिया २०२५-२६ वेळापत्रक
महाराष्ट्र
शासनाने यंदा वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. खालीलप्रमाणे नवीन वेळापत्रक निश्चित
करण्यात आले आहे:
प्रक्रिया | तारीख |
---|---|
शाळा नोंदणी सुरू होणार | १८ डिसेंबर २०२४ |
विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार | ३१ डिसेंबर २०२४ |
पहिली निवड यादी जाहीर होणार | १० मार्च २०२५ |
अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण | १० मार्च २०२५ |
RTE
admission 2025-26 वेळापत्रकानुसार यंदा प्रवेश प्रक्रिया नेहमीपेक्षा जलद होणार आहे.
त्यामुळे पालकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
आरटीई
प्रवेशासाठी पात्रता निकष
आरटीई
अंतर्गत (RTE
25% admission) प्रवेश घेण्यासाठी
विद्यार्थ्यांना खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
-
विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
-
विद्यार्थी ३ ते ६ वयोगटातील असावा.
-
विद्यार्थी व पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (EWS) किंवा मागासवर्ग (BC) कुटुंबातील
असावेत.
आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया
(RTE 25% admission) आरटीई प्रवेश अर्जासाठी खालील
टप्पे पार करणे आवश्यक आहे:
१. शाळांची नोंदणी:
-
शाळांनी त्यांच्या नोंदणीसाठी १८ डिसेंबर २०२४ पासून अधिकृत पोर्टलवर (https://student.maharashtra.gov.in) प्रक्रिया सुरू
करावी.
-
शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती अपलोड करणे आवश्यक
आहे.
२. पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी
करणे:
-
पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी २८ डिसेंबर २०२४ पासून सुरू करावी (तात्पुरती
तारीख).
अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
- विद्यार्थ्याचा जन्म दाखला
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे
३. प्रवेशासाठी शाळांची निवड:
-
शाळांचा पर्याय निवडताना पालकांनी जवळच्या शाळांचा विचार करावा.
-
निवडलेल्या शाळांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरावी.
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती
४. निवड यादी जाहीर:
-
पहिली निवड यादी १० मार्च २०२५ रोजी जाहीर केली जाईल.
-
यादीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक
आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेशाचे फायदे
-
आर्थिक दुर्बल गटातील मुलांना नामांकित शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळते.
-
विद्यार्थी व पालकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.
-
सामाजिक समानतेला प्रोत्साहन दिले जाते.
आरटीई प्रवेश प्रक्रिया संदर्भासाठी उपयुक्त संकेतस्थळे
- अधिकृत पोर्टल: [RTE 25% % admission Form Link]
-
प्रवेश प्रक्रियेसंबंधित अद्ययावत माहिती शासनाच्या परिपत्रकांद्वारे नियमित जाहीर
केली जाईल.
पालकांसाठी महत्त्वाच्या टिपा
-
वेळेच्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे.
-
सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
-
पोर्टलवरील सूचना व वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे.
आरटीई
२५% प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. यंदाच्या बदललेल्या
वेळापत्रकानुसार पालकांनी व शाळांनी प्रक्रिया लवकर सुरू करणे आवश्यक आहे.
RTE 25% % admission, RTE admission,आरटीई 25% टक्के,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,,rte,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ application,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६,आरटीई २५ टक्के प्रवेश २०२५-२६ login,rte 25% admission maharashtra gov in form 2025% 26,rte 25% admission age limit,what is rte 25% ,rte 25% student list,rte 25% rules,rte 25% up school list,rte 25% admission 2023-24,rte 25% admission 2023-24 date,rte 25% admission form 2023-24,rte 25% admission help center,rte 25% admission 2023-24 maharashtra
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS