सायबर फसवणूकीविरुद्ध सजगता: तक्रार कशी करावी आणि स्वत:चे संरक्षण कसे करावे
सायबर फसवणूकीविरुद्ध सजगता: तक्रार कशी करावी आणि स्वत:चे संरक्षण कसे करावे
सायबर फसवणूक ही आजच्या डिजिटल युगातील एक मोठी समस्या बनली
आहे. अनेक लोक फोन कॉल, एसएमएस, ईमेल, सोशल मीडिया, व्हाट्सऍप, टेलिग्राम
इत्यादी मार्गांनी फसवले जातात. या फसवणुकीमुळे लोकांचे पैसे, वैयक्तिक माहिती आणि विश्वास हरवतो. परंतु, आता
तुम्ही या फसवणुकीविरुद्ध सहजपणे तक्रार करू शकता. सरकारने यासाठी अनेक पोर्टल्स
उपलब्ध करून दिली आहेत, ज्यातून तुम्ही फसवणूक करणाऱ्या
मोबाईल नंबर, ईमेल, वेबलिंक, सोशल मीडिया खाते इत्यादींची तक्रार नोंदवू शकता.
फसवणूकीची तक्रार करण्यासाठी सोपे पोर्टल्स
1. संचारसाथी पोर्टल (Sanchar Saathi Portal)
- हे पोर्टल
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने विकसित केले आहे.
- यावर फसवणूक
करणाऱ्या मोबाईल नंबरची तक्रार करता येते.
- गेल्या
वर्षभरात या पोर्टलद्वारे 1 कोटीपेक्षा अधिक फसवणूकीचे नंबर
बंद करण्यात आले आहेत.
- तक्रार
करण्यासाठी लिंक: https://sancharsaathi.gov.in/
2. सायबर क्राइम पोर्टल (Cyber Crime Portal)
- हे पोर्टल
केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केले आहे.
- यावर
फसवणूकीच्या मोबाईल नंबर, ईमेल, एसएमएस,
वेबलिंक, सोशल मीडिया खाते, व्हाट्सऍप, टेलिग्राम, फेक
व्हिडिओ इत्यादींची तक्रार करता येते.
- तक्रार
करण्यासाठी लिंक: https://cybercrime.gov.in/Webform/cyber_suspect.aspx
3. संशयास्पद नंबर/खात्याची तपासणी
- कोणताही
आर्थिक व्यवहार किंवा संभाषण करण्यापूर्वी मोबाईल नंबर, बँक
खाते, ईमेल, UPI ID, सोशल मीडिया खाते
संशयास्पद आहे का याची तपासणी करता येते.
- तपासणीसाठी
लिंक: https://cybercrime.gov.in/Webform/suspect_search_repository.aspx
सायबर फसवणूकीपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे?
1. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या
- कोणत्याही
आर्थिक व्यवहाराची सूचना येण्याची वेळी तपासून पहा.
2. कठीण पासवर्ड वापरा आणि तो नियमित बदला
- ऑनलाइन बँकिंग
आणि इतर खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
3. आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित कारवाई करा
- फसवणूक
झाल्यास 155260 या हॉटलाइन नंबरवर कॉल करा आणि तक्रार
नोंदवा.
- बँक
अधिकाऱ्यांशी आणि सायबर सेल विभागाशी संपर्क साधा.
4. ऑनलाइन फसवणुकीची तक्रार तात्काळ नोंदवा
- तक्रार
करण्यासाठी पोर्टल: www.cybercrime.gov.in
सायबर फसवणुकीचे प्रकार
सायबर फसवणूकीचे अनेक प्रकार आहेत, जसे
की:
- फेक व्हिडिओ आणि फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग
- अमिषे दाखवून पैसे मागणे
- फिशिंग लिंकद्वारे वैयक्तिक माहिती चोरणे
- फेक UPI IDद्वारे पैसे मागणे
या सर्व प्रकारच्या फसवणुकीविषयी अधिक माहिती येथे
वाचा:
https://rtihumanrightsassociation.com/types-of-online-frauds-and-complaints-to-be-filed/
सायबर फसवणूकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सजगता आणि जागरूकता
आवश्यक आहे. फसवणूक झाल्यास त्वरित योग्य पोर्टलवर तक्रार नोंदवा आणि इतरांना ही
माहिती शेअर करून जनजागृती करा. सायबर फसवणूकीविरुद्ध लढा देणे ही आपली सामूहिक
जबाबदारी आहे!
सायबर सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे!
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
COMMENTS