Government decision regarding EWS certificate,आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील (EWS) काही विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी
EWS प्रमाणपत्रासंदर्भात शासनाचा निर्णय: केंद्राच्या नमुन्यातील प्रमाणपत्र ग्राह्य
मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा
कक्षामार्फत वर्ष 2024-25 साठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील
(EWS) काही
विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी केंद्र सरकारच्या
नमुन्यातील प्रमाणपत्र सादर केले होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
हिताच्या दृष्टीने आणि या शैक्षणिक वर्षासाठी विशेष बाब म्हणून, केंद्राच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र प्रवेशासाठी ग्राह्य
धरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा)
पाटील यांनी दिली.
या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण
विभागाने अधिकृत पत्र सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला निर्गमित केले असून, या निर्णयामुळे अनेक
विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS