⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जिजाऊ माँ साहेब | Jijau Maa Saheb

जिजाऊ माँ साहेब

(दि. १२ जानेवारी, १५९८ - १७ जून, १६७४)

(अल्प परिचय)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्य साधारण आहे; कारण त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांच्या रयतेच्या मातोश्री होत्या. त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते. जिजाबाईचा जन्म दि. १२ जानेवारी १५९८ रोजी झाला.जिजाबाई शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीत इ. स. १६३६ पूर्वीच रहावयास आल्या. पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर रामायण, महाभारत, भागवत आदींतील कथा सांगितल्या. विशेषत: शांतिपर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यांतील कथा सांगितल्या. जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली. पुण्यात लालमहाल प्रासाद बांधला.शहाजींच्या राजकारणाचे, धोरणांचे त्यांना ज्ञान होते. पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले. राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंड भैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला. त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता. त्यावर मातोश्री साहेबे ( जिजाबाईनी) जे आश्वासन दिले आहे, तसेच माझेही आश्वासन राहील, असे दि. १३ जुलै १६५३ च्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात. शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत. जिजाबाई महाराजांच्या राज्यकारभारात अखेरपर्यंत (१६७४) जातीने लक्ष घालीत. राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत.छत्रपती शिवाजी महाराज आग्राभेटीवर गेले असता त्यांनी सर्व कारभार जिजाबाईच्या हाती सुपुर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते. जिजाबाई स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी त्यांचे पाचाड (रायगड) येथे निधन झाले.

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम