कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने PF खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारी 2025 रो
PF खातं (PF Account) ट्रान्सफर करणं झालं अधिक सोपं!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने PF खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्याचा
महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
15 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या
परिपत्रकानुसार, PF ट्रान्सफरसाठी सध्याच्या किंवा मागील नियोक्त्याच्या मंजुरीची
आवश्यकता नाही, अशा काही विशिष्ट प्रकरणांमध्ये ही सवलत लागू करण्यात आली आहे.
नवीन नियम आणि प्रक्रिया:
- समान UAN
आणि आधारशी लिंक:
- जर तुमचं
UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधारशी
जोडलेलं असेल आणि एकच असेल, तर PF खातं थेट ट्रान्सफर करता येईल.
- वेगवेगळे UAN
आणि आधारशी लिंक:
- जर तुमच्याकडे वेगवेगळे UAN असतील
(1 ऑक्टोबर 2017
नंतर तयार झालेले) आणि ते एकाच
आधारशी लिंक असतील, तर ट्रान्सफर प्रक्रियेस कोणताही अडथळा येणार नाही.
- जुने UAN
आणि आधारशी लिंक:
- जर
1 ऑक्टोबर 2017
पूर्वीचा UAN
आधारशी लिंक असेल आणि तुमचं नाव, जन्मतारीख
व इतर माहिती सर्व आयडींमध्ये समान असेल,
तर ट्रान्सफर सहज शक्य आहे.
- जुना आणि नवीन UAN
ट्रान्सफर:
- जर एका UAN
ची निर्मिती 1 ऑक्टोबर
2017 पूर्वी झाली असेल आणि दुसरा UAN त्यानंतर
तयार झाला असेल, पण दोन्ही UAN
आधारशी जोडलेले असतील, तर
व्यक्तिगत माहिती समान असल्यास ट्रान्सफर सोपी होईल.
ट्रान्सफर
प्रक्रिया कधी थेट होईल?
- जर एकाच UAN
ला अनेक सदस्य आयडीज जोडले असतील.
- वेगवेगळ्या UAN
ला एकाच आधारशी लिंक केल्यास.
- जुने UAN आधारशी लिंक असून व्यक्तिगत माहिती जुळत असल्यास.
- आधारशी लिंक केलेल्या UAN
च्या माहितीमध्ये कोणताही फरक
नसल्यास.
महत्त्वाचे
मुद्दे:
- UAN आणि
आधार लिंक असणं आवश्यक आहे.
- नाव, जन्मतारीख किंवा इतर माहितीमध्ये विसंगती असल्यास
प्रक्रिया थांबवली जाऊ शकते.
EPFO
च्या निर्णयाचे फायदे:
- कर्मचार्यांची PF
ट्रान्सफर प्रक्रिया जलद आणि सुलभ
झाली आहे.
- नोकरी बदलताना कागदपत्रांची पडताळणी करण्याचा त्रास कमी
होईल.
- आधारशी लिंक असलेल्या खात्यांमुळे विश्वासार्हता वाढली
आहे.
EPFO च्या या नव्या नियमांमुळे नोकरी बदलणाऱ्या लाखो कर्मचार्यांसाठी
PF ट्रान्सफर प्रक्रिया अधिक सोपी आणि कार्यक्षम झाली आहे. जर
तुम्ही नोकरी बदलली असेल किंवा (PF Account) ट्रान्सफर करायचं असेल,
तर याचा जरूर लाभ घ्या.
अधिक माहितीसाठी EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS