Balasaheb Thackeray,बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे
(दि.२३ जानेवारी १९२६ - १७ नोव्हेंबर २०१२)
(अल्प परिचय)
"शिवसेना" या राजकीय पक्षाचे संस्थापक व सिद्धहस्त
प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबात
झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावणारे
केशवराव ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे वडील होत. त्यांचा सामाजिक कार्याचा
वारसा बाळासाहेबांनी पुढे चालविला.बाळासाहेबांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण मुंबईत
झाले. विद्यार्थिदशेतच त्यांना चित्रकलेचे धडे मिळाले आणि पुढे त्यांनी तो व्यासंग
वाढविला. मुंबईच्या फ्री प्रेस जर्नल मध्ये त्यांनी व्यंग्यचित्रकार म्हणून १९६०
पर्यंत नोकरी केली. पुढे त्यांनी त्याच वर्षी "मार्मिक” हे
व्यंग्यचित्रात्मक साप्ताहिक सुरू केले. त्याचे ते प्रमुख संपादक झाले. मार्मिकने
लवकरच लोकप्रियता मिळविली. त्यांच्या व्यंग्यचित्रांना राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळालेली असून त्यांची व्यंग्यचित्रे "न्यूयॉर्क
टाइम्स" सारख्या जगद्मान्य इंग्रजी दैनिकातही झळकली आहेत..बाळासाहेबांचे
व्यंग्यचित्रकाराहून अगदी वेगळे व्यक्तिमत्व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या
राजकीय पक्षाच्या स्थापनेतून व त्या पक्षाच्या कार्यपध्दतीतून दिसून येते.
बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी "शिवसेनेची संघटना सभासदांची अधिकृत नोंदणी
करून बांधली. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा मुंबईत भरला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी हे शिवसेनेचे स्फूर्तिस्थान म्हणून
संघटनेस त्यांचेच नाव देण्यात आले.शिवसेनेने प्रखर राष्ट्रवादी भूमिका अंगीकारली.
त्यांचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद नसून भारतीय राष्ट्रवाद आहे आणि राजकीय
सत्ता हस्तगत करणे, हे पक्षाचे ध्येय आहे. पक्षाच्या
प्रचारासाठी बाळासाहेबांनी दैनिक 'सामना' हे वृत्तपत्र काढले. त्याचे ते प्रमुख संपादक होते. भारतीय जनता
पक्षाबरोबर युती करून त्यांनी महाराष्ट्रात युतीची सत्ता आणली व राबविली
(१९९५-२०००). गरिबांसाठी एक रुपयात झुणका भाकर, मातोश्री
वृद्धाश्रम, रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका हे त्यांचे उपक्रम
वाखाणले गेले. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करताना बाळासाहेब अनेकदा टीकेचे व
वादाचे लक्ष्य ठरले. तथापि आपण राष्ट्र विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या विरोधात
आहोत, असे ते म्हणत
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS