दहावी व बारावीच्या अंतर्गत गुण (प्रॅक्टिकल व इंटरनल) ऑनलाइन करण्याची महत्त्वाची सूचना
दहावी व बारावीच्या अंतर्गत गुण (प्रॅक्टिकल व इंटरनल)
ऑनलाइन करण्याची महत्त्वाची सूचना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या फेब्रुवारी/मार्चमध्ये होणाऱ्या दहावी (इ. 10
वी) व बारावी (इ. 12 वी) परीक्षेसाठी महत्त्वाची सूचना जारी
केली आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रॅक्टिकल व इंटरनल मूल्यांकनांचे गुण
ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, अशी सूचना देण्यात आली आहे.
ऑनलाइन सादरीकरणाची प्रक्रिया
- गुण सादरीकरणासाठी संकेतस्थळ: mahahsscboard.in
- लॉगिनद्वारे प्रवेश: शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या
विशिष्ट लॉगिन आयडीद्वारे या प्रक्रियेसाठी प्रवेश मिळवावा.
- निर्दिष्ट वेळेत सादरीकरण: दिलेल्या वेळेतच सर्व गुण
सादर करणे अनिवार्य आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना
1. फेब्रुवारी/मार्च 2025 च्या
परीक्षेसाठी: संबंधित शाळा व महाविद्यालयांनी वेळेतच मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण
करावी.
2. गुणांची अचूकता: सरसकट गुण न देता विद्यार्थ्यांच्या
प्रदर्शनावर आधारित मूल्यांकन करणे गरजेचे आहे.
3. ऑनलाइन सादरीकरणाचे महत्त्व: या प्रक्रियेमुळे बोर्डाला
अचूक व सुस्पष्ट डेटा मिळेल, तसेच गुणवत्तेसंदर्भातील
अपारदर्शकता टाळली जाईल.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत
(प्रॅक्टिकल व इंटरनल) गुणांची नोंद वेळेत करावी व शिक्षण मंडळाने दिलेल्या
वेळापत्रकाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे
परीक्षेच्या तयारीसाठीची सर्व कामे योग्य वेळेत व सुरळीत होण्यास मदत होईल.
सूचना: संबंधित शाळा व महाविद्यालयांनी अधिकृत पत्रक तपासून
या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य कार्यवाही करावी.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२
वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी )फेब्रुवारी-मार्च २०२५ प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व
श्रेणी ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती
१. फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचे
इ. १२ वी व इ. १० वी च्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण व श्रेणी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय /
शाळा यांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Internal/Practical Mark & Grade या Linke मधून मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.
२. गुण नोंदविण्याकरीता Maker-Checker कार्यपद्धती वापरावयाची असून, त्याकरीता सध्याच्या Login Id जसे इ.१२ वी (JXxxxxxx_1 ) तसेच इ.१० वी ( SxxXXXX) हा अनुक्रम प्राचार्य /
मुख्याध्यापक यांचेसाठी असून, त्यांनी Chocker म्हणून काम करावयाचे आहे. तर इ शिक्षक / लिपिक यांनी Maker मधून गुण नोंदविण्याचे काम करावयाचे
आहे.
३. Maker
Login मध्ये विषय निहाय / माध्यम निहाय त्या त्या
विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी (Blank
Marksheet) प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान
गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील तसेच त्या संदर्भातील तारखा स्वतंत्र्यरित्या
कळविण्यात येतील.
४. विषयनिहाय प्रात्यक्षिक / अंतर्गत
मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोन्या गुणपत्रक (Blank Marksheet) बैठक
क्रमांकानुसार ( Seat no wise) गुणांच्या / श्रेणीच्या नोंदी घेऊन Mi Login मधून त्याची HSC Marks /
Grade या Option मधून Online Entry करायची आहे. सदर गुणांची नोंद बोग्य झाली आहे का याबाबत Printout काढून खात्री करता येईल. एका सर्व
गुणांची / श्रेणीची Online नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरीता "Send for
Approval to checker हा option]
Enable होईल. त्याव्दारे सर्व पृष्ठे ही Checker कडे तपासणीसाठी पाठविता अशाप्रकारे
सर्व विषयांची पृष्ठे Entry पूर्ण करून Checker कडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेत.
५. Checker
User ला इ.१२ वी (JXxxxxxxx ) तसेच इ. १० वी ( Sxxxxxxx1) त्याचे 10 मध्ये Maker User ने पाठविलेली सर्व पृष्ठ HSC Marks / Grade या Option मध्ये तपास उपलब्ध होतील. Checker User ने सर्व विषयाच्या गुणाच्या /
श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठ मान्य (approve ) करावयाच्या आहेत सर्व पृष्ठे मान्य (approve) झाल्यानंतर "Send for Board Approval" हा Option] Enable होईल. त्या Option मधून सर्व विषयांचे अंतिम गुण
श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत.
६. आपल्या कनिष्ठ महाविद्यालय /
शाळेमधील विद्याथ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर
अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी अंतर्गत
मुल्यमापन, श्रेणी
इत्यादी गुणत संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर प्राचार्य
/ मुख्य महाविद्यालय / शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक
मंडळाकडे निर्धारीत तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकिटावर कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No घालून जमा करावयाचे आहेत. तसेच गुण
प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.
७. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यामापन परीक्षा नियमित
कालावधीमध्ये देवू न विद्यार्थ्यासाठी सदरची ऑउट ऑफ टर्न परीक्षा लेखी परीक्षेनंतर
राज्य मंडळाने प वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.
८. नियमित कालावधीमध्ये जे
विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्याचे सदर ऑउट ऑफ टर्न परीक्षेसाठी
ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय / शाळांना उपलब्ध क जातील. सदर विद्यार्थ्याचे गुण
ऑनलाईन पध्दतीने "Out of Turn marks" या Opti नोंदविण्याची कार्यवाही शाळा व क. महाविद्यालयानी उपरोक्त पद्धती
प्रमाणेच Checker Login चा वापर करून करावयाची आहे.
९. अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांच्या Online Syste ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक (Additional Seat No) उपलब्ध झालेले नाहीत विषयबदल केला आहे अशा सर्व विद्याथ्र्यांचे गुण प्रचलीत पद्धतीने निर्धारित तारखेस मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS