⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

(दि. १२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२)

(अल्प परिचय)

एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी आणि थोर विचारवंत. मूळ नाव वीरेश्वर रूढ झालेले नाव नरेंद्रनाथ नरेंद्रांवर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठा झाल्यावर वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. मेट्रपॉलिटन इन्स्टिट्यूट, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि जनरल असेंब्लीज इन्स्टिटयूशन येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण होऊन नरेंद्र १८८४ साली बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.महाविद्यालयीन जीवनात त्यांनी जगाचा इतिहास आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास केला. मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. बकिमचंद्र वतजींच्या आनंदमठ (१८८२) ह्या कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. स्वामी विवेकानंदावर सर्वांत अधिक परिणाम झाला तो केशवचंद्र सेनआणि शिवनाथ शास्त्रीयांच्या ब्राह्मो समाजाचा. त्या समाजाचे रितसर सदस्यत्व नरेंद्राने स्वीकारले. मूर्तिपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तेथून उचलले. नरेंद्रांच्या ठायी आरंभापासून संन्यासाची ओढ होती. रामकृष्ण परमहंस (१८३६-८६) यांच्या भेटीनंतर तिला खरी जाग आली.कन्याकुमारीजवळच्या समुद्रात असलेल्या एका शिलाखंडावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना या समाजाला जाग आणण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यानंतर अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला. वेदान्ताचे छोटेछोटे वर्ग घेतले, लंडन आणि न्यूयॉर्क येथे वेदान्त सोसायटयांची स्थापना केली. डॉ. राइट, इंगरसोल, विल्यम जेम्स, माक्स म्यूलर, डॉ. पॉल डायसेन असे तत्त्वज्ञही प्रभावित होऊन गेले. जे. जे. गुडविन, सेव्हियर पतिपत्नी, ओली बुल, सिस्टर ख्रिस्तिन, जोसेफाइन मॅक्लाउड अशा पाश्चात्त्य शिष्यांनी आपली जीवने विवेकानंदांच्या चरणी वाहिली. मिस मार्गारेट नोबल किंवा भगिनी निवेदिताया त्यांत आग्रगण्य होत. १८९७ च्या जानेवारीत भारतामध्ये परत आल्यावर कोलंबोपासून अलमोडवापर्यंत विवेकानंदांचे भव्य स्वागत झाले.भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखविता येत नाही. १८९९ च्या जूनमध्ये विवेकानंद पुन्हा यूरोप अमेरिकेत गेले, ते १९०० च्या डिसेंबरमध्ये परत आले. त्याआधी दीड दोन वर्षांपासून अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत चालले होते. ४ जुलै १९०२ या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम