राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू - शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू - शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई, 20 मार्च 2025 - राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला
आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबविला जाणार असून, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा बदल पूर्णपणे अंमलात
येईल. राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शिक्षणाचा दर्जा
उंचावावा, या
उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे
यांनी आज विधानसभेत दिली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान
परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा
केली. "इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणानुसार CBSE अभ्यासक्रमाचा आराखडा सुकाणू समितीने मान्य केला आहे का?" असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला
होता. त्याला उत्तर देताना भुसे म्हणाले, "राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू
समितीने मान्यता दिली आहे. CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून दिली जाणार असून, 1 एप्रिल 2025 पासून नवीन सत्राला सुरुवात
होईल."
मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
या निर्णयाला गती देण्यासाठी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अलीकडेच मंत्रालयात सर्व विभागांच्या पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी शालेय शिक्षण
विभागाला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.
"महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा आघाडी घ्यावी," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
होता. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी CBSE पॅटर्नचा अंगीकार करताना राज्याच्या गरजेनुसार त्यात आवश्यक
बदल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल
हा निर्णय राज्यातील शालेय शिक्षणात
मोठा बदल घडवून आणणारा ठरणार आहे. CBSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय
पातळीवरील स्पर्धात्मक शिक्षण मिळेल, तसेच मराठी माध्यमातूनही हा अभ्यासक्रम उपलब्ध होणार
असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. शिक्षण विभागाने या बदलाची
अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे
राज्यातील शिक्षण क्षेत्रात नवी आशा निर्माण झाली असून, येत्या काळात त्याचे सकारात्मक
परिणाम दिसून येतील, अशी
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url