नवोदय प्रवेश परीक्षा सराव
विषय - मराठी
(उतारा - 2)
वंद्नीय
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल
१९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते
ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला
दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी
मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद
देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत
आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.
इ.सन.१९२५
मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम
भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे
त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम
चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली.
१९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”
वरील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील पाच प्रश्नांची उत्तर द्या
COMMENTS