नवोदय प्रवेश परीक्षा सराव विषय – मराठी (उतारा - 3)

 

नवोदय प्रवेश परीक्षा सराव

विषय – मराठी

 (उतारा - 3)

           आदर्श आचरण व कीर्तन याद्वारे बहुजन समाजातील मागास वर्गीयान मधील अंधश्रद्धा तसेच शिक्षणाविषयीचे प्रेम जागविण्याकरीता ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्या संत गाडगे बाबां चा जन्म २३ फेब्रुवारी १८७६, जि. अमरावती,शेंडगावी येथे झाला.त्यांचे संपूर्ण नावडेबुजी झिंगराजी जाणोरकर, त्यांच्या आईचे नाव सखुबाई. जनजागृती साठी त्यांनी स्वत:चे जीवन कीर्तने करीत खेडोपाडी फिरत घालविले.त्यांच्या अंगात सदैव घोंगडी चा अंगरखा व हाती मातीचे गाडगे असायचे. त्यामुळे त्याना जनमानसाने गोधडीबाबाकिंवा गाडगेबाबा नाव पाडले व त्या नावानेच प्रसिद्ध झाले. ते परीट समाजातले होते.

              त्यावेळी तो समाज फार मागासलेला होता.त्यांचे वडील सधन शेतकरी होते.त्याकाळी त्यांच्या समाजात देवाच्या नैवेद्या पासून ते पाहुण्यांच्या पाहुणचारात सुद्धा दारू व मास हेच त्यांचे दैवत असायचे. हीच त्यांची धर्म रूढी असे. त्यामुळे त्यांचे वडील दारू व मास या व्यसनापायी सर्वस्वाला त्यागून फ़ुफ़ुसाच्या व्याधीने खिळले त्यात घर-दार,शेती-वाडी,पैसा सर्वच गमावून बसले. १८८४ साली ते स्वर्गवासी झाले. तेव्हा त्यांच्या आईवर फार मोठे संकट आले.नंतर डेबुला घेवून त्या मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरा गावी आल्या.तेच त्यांचे माहेर होते.

             देबू आजोबा( हंबीरराव )व मामां( चंद्रभानजी )  यांच्या घरी मोठा होऊ लागला.रोज पहाटे उठून गाई- म्हशीचा गोठा साफ करणे.जनावरे स्वच्छ करणे,हे काम डेबू फार आवडीने करायचा,त्यांची मामी कौतुकाबाई जात्यावरील गाणे म्हणून पीठ द्ळायची ते डेबु फार आवडीनेऎकायचा व पाठ करायचा.

वरील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील पाच प्रश्नांची उत्तर द्या

परिक्षेच्या सूचना-
  1. परीक्षेमध्ये दिलेला उतारा पूर्ण वाचवा.
  2. उताऱ्यावर एकूण ०५ प्रश्न ०५ गुणांसाठी दिलेली आहे.
  3. सर्व प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे.
  4. एक उताऱ्यावरील प्रश्नांना सोडवण्यासाठी किती वेळ लागतो तो बघावा आणि त्यात सुधारणा करावी.
  5. परीक्षेसाठी शुभेच्छा..........
नवोदय प्रवेश परीक्षा सराव विषय - मराठी २

All Exam Home

 

 

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url