नवोदय प्रवेश परीक्षा सराव
विषय - मराठी
(उतारा - १)
विज कडाडते,ढग गडगडाट करतात आणि मग मस्त मातीचा वास सुटतो. थोड्याच वेळात जोराचा पाऊस सुरू होतो पावसाळ्याची ही सुरूवात मला खूप खूप आवडते. विज कडाडते तेंव्हा थोड घाबरायला होत,पण त्यानंतर येणाऱ्या धोधो पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते. सगळी मोठी माणसे ओरडतात पावसात जायला लागलो की, पण मी कुण्णाच न ऐकता पावसात जातो.आजुबाजूची मुलेही माझ्याबरोबर भिजायला येतात. आम्ही पावसात गोल गोल फिरून म्हणतो ..येरे येरे पावसा तुला देतो पैसापैसा झाला खोटा पाऊस आला मोठायेग येग सरी माझे मडके भरीसर आली धाऊन मडके गेले वाहून .
अशी मजा येते ना ,पण आई लगेच "फार भिजू नको आत चल " सांगायला येते.असा राग येतो ना मोठ्या माणसांचा.सगळे फारच ओरडायला लागले की घरात जायलाच लागते. सर्दी व्हायला नको म्हणून आईखसाखसा डोके पुसून देते गरम गरम आले घालून केलेला चहा देते .
मला पावसाळा खूप आवडतो .एकदा पाऊस पडायला लागला की रस्त्यावर पाणी वाहायला लागते जणू काय घराच्या समोर नदीच वाहू लागते. वळचणीला तर धबधबा पडत असतो. त्या धबधब्याखाली भिजायला तर खुप्पच मज्जा येते ! बाहेर पाणी साठले की मी जुन्या वह्यातली पाने फाडून होडी बनवतो बाईनी मागच्या वर्षीच होडी कशी बनवायची ते शिकवले आहे. मग होड्या बनवून त्या पाण्यात सोडायच्या त्या पुढे पुढे जायला लागल्या की त्यांच्या मागे पळायचे. रस्त्यावरचा चिखल सगळा कपड्यावर उडतो हातपायही चिखलाने भरून जातात पण मज्जा येते चिखलात खेळायला! थोडा ओरडा पडतो आईबाबांचा, पण तरी परत परत बाहेर पावसात खेळायला आवडतेच.भरपूर पाऊस पडला की नदीला पूर येतो. पूर बघायला बाबा मला नदीवर घेऊन जातात.बापरे ,किती जोरात पाणी धावत असते .ते लाल चहासारखे गढूळ पाणी बघायला खूप आवडते. पुराच्या पाण्याकडे एकसारखे बघत राहीले की आपणच फिरतोय असे वाटते . एकदा तर मला चक्करच आली होती पण बाबाना नाही सांगीतले, नाहीतर पुर बघायला पुन्हा न्यायचे नाहीत.पावसाळा सुरू झाला की रस्ते एकदम स्वच्छ होतात .झाडेही धुतली जातात सगळीकडे हिरवेगार दिसायला लागते पावसाळा आला की हवा थंड होते, मला अशी हवा आवडते.
वरील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील पाच प्रश्नांची उत्तर द्या
COMMENTS